नाशिक : कौटुंबिक वादातून रु पा राकेश सिंग (२६, सुकदेव नगर, ढाडेगाव) या विवाहितेने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. मंगळवारी (दि.२५) सकाळी हा प्रकार घडला. कौटुंबिक कारणातून आलेल्या नैराश्यापोटी रु पा यांनी आत्महत्या केली. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.दुसऱ्या घटनेत शहरातील अंबड पोलीस ठाणे हद्दीतील शिवशक्ती चौक व गंगापूर पोलीस ठाणे हद्दीतील आनंदवली परिसरात दोघांनी घरात गळफास घेत आत्महत्या केली. पंढरीनाथ गंगाधर पांचाळ (रा. शिवशक्ती चौक) याने मंगळवारी (दि.२५) गळफास घेतला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर आनंदवली परिसरातील संतोष व्यंकटराव हातमोडे (३०) याने देखील मंगळवारी सकाळी घरात गळफास घेतल्याचे आढळून आले. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शहरात दोघा युवकांसह विवाहितेची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 02:41 IST
नाशिक : कौटुंबिक वादातून रु पा राकेश सिंग (२६, सुकदेव नगर, ढाडेगाव) या विवाहितेने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. मंगळवारी (दि.२५) सकाळी हा प्रकार घडला. कौटुंबिक कारणातून आलेल्या नैराश्यापोटी रु पा यांनी आत्महत्या केली. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शहरात दोघा युवकांसह विवाहितेची आत्महत्या
ठळक मुद्देपोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद