मालेगाव : येथील लिटिल एन्जल्स् शाळेचे अनधिकृत बांधकाम काढण्यास गेलेल्या महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकासह प्रभाग एकचे अधिकारी पंकज सोनवणे यांना आज सायंकाळी संस्थाचालकांकडून मारहाण करण्यात आली. यामुळे शाळेच्या आवारात एकच गर्दी झाली होती. रात्री उशिरा कॅम्प पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.महापालिकेने लिटिल एन्जल शाळेला २ मार्चला नोटीस देऊनही अतिक्रमण काढण्यात आले नाही. यामुळे प्रभाग अधिकारी पंकज सोनवणे अतिक्रमण हटाव पथकासह शाळेच्या आवारात पोहोचले. अतिक्रमण काढत असताना संस्थाचालकांनी कॅबिनमध्ये बोलविले. सोनवणे तेथे गले असता संस्थाचालक गौरव ढंढारिया यांनी सोनवणे यांना मारहाण केली. घटनास्थळी कॅम्प पोलीस पोहोचले. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. (वार्ताहर)
मालेगावी अधिकाऱ्यास मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2016 23:15 IST