शरद बागुल हे दोन दिवसांपासून बेपत्ता होते. गुरुवारी (दि.२६) सकाळी त्यांचा मृतदेह मोरेनगर शिवारातील आरम नदीकाठच्या विहिरीत तरंगत असल्याचे आढळून आले. शेतकरी नानाजी सोनवणे यांनी तत्काळ सटाणा पोलिसांना खबर दिली. पोलिसांनी शोध घेऊन मृतदेह शरद बागुल यांचा असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी सटाणा पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.
-----------------------------------------------------
अपघातात एक ठार
सटाणा : मोरेनगर येथील दत्ता केशव जोशी (४८) हे मोटारसायकलने डांगसौंदाणेमार्गे सुळे पिंपळे येथे आपल्या नातेवाइकांकडे जात असताना गणोरेनजीक अचानक मोटारसायकल स्लिप झाल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी कळवण पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.