शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस साडूच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:27 IST

याप्रकरणी पोलीसांनी दिलेली माहिती अशी, पंचवटी पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस शिपाई संशयित मनोज खैरे यांच्यासह त्यांच्या सासरच्या अन्य काही ...

याप्रकरणी पोलीसांनी दिलेली माहिती अशी, पंचवटी पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस शिपाई संशयित मनोज खैरे यांच्यासह त्यांच्या सासरच्या अन्य काही लोकांच्या छळाला कंटाळून त्यांचा साडू कुणाल विलास गायकवाड (३४, रा. त्र्यंबकनगर, हिरावाडी) यांनी आत्महत्या केल्याची फिर्याद मयत कुणाल याचा भाऊ योगश विलास गायकवाड यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात दिली आहे. या फिर्यादीनुसार पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी संशयित पोलीस मनोज खैरे यांच्यासह सोनाली सोनवणे, ज्योती खैरे, वृषाली महाजन, रमेश त्र्यंबक निकम व माणिक महाजन या संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

चार महिन्यांपूर्वी कुणाल गायकवाड यांच्या पत्नीने आत्महत्या केली होती. यामुळे सासरच्या मंडळीने दिलेल्या तक्रारीवरून त्यांच्याविरुध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर त्यांना न्यायालयातून जामीन मंजूर करण्यात आला होता. साडू मनोज खैरे आणि अन्य संशयितांनी त्यांच्याशी संपर्क साधत कुणालकडे मोठी आर्थिक मागणी करून तसेच धमक्या व दमदाटी करून आपल्या भावास आत्महत्या करण्यास भाग पाडल्याचे योगेश याने तक्रारीत म्हटले आहे. त्यासंबंधी ध्वनी व चित्रफितीचा पुरावा असल्याचे सांगून ‘आमचे पैसे आणि बहिणीचे दागिने परत कर नाही तर पुन्हा तुला जेलमध्ये पाठवू’ अशी धमकी संशयितांनी एका नातेवाइकाच्या विवाहात दिल्याचेही योगेशने पोलिसांना सांगितले. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.