शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
2
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
3
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
4
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
5
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
6
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
7
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
9
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
10
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले
11
ऑल टाईम हायवरुन सोन्याचे दर घसरले, चांदीच्या दरात मात्र तेजी; पाहा लेटेस्ट किंमत
12
'या सगळ्यांना मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी करायला हवे', खासदार संजय राऊत नितेश राणेंवर भडकले
13
Census of India: ३५ लाख कर्मचारी करणार जनगणना, नागरिकांनाही करता येणार स्वयंनोंदणी!
14
अरेरे! लग्नानंतर बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; नवरा म्हणतो, "राजा रघुवंशी होण्यापासून वाचलो"
15
सेलिब्रिटी जोडप्याने फिल्ममेकरचं केले अपहरण, गुन्हा दाखल; रस्त्यात एकट्याला अडवले, मग...
16
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
17
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
18
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
19
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
20
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा

देवळाली कॅम्प येथे दोघांची आत्महत्त्या

By admin | Updated: July 5, 2014 00:16 IST

देवळाली कॅम्प येथे दोघांची आत्महत्त्या

देवळाली कॅम्प : महिन्यापूर्वी लग्न झालेल्या युवकाने महाविद्यालयीन युवतीसह लहवित रेल्वे स्टेशनजवळ धावत्या रेल्वेखाली स्वत:ला झोकून देत आत्महत्त्या केल्याची घटना घडली. येथील लष्कराच्या डेअरी फार्म वसाहतीत राहणाऱ्या संतोष सोनू कुंदे (२५) व कल्पना ऊर्फ मिनू वसंत सहाणे (१८) या दोघांनी गुरुवारी (दि. ३) रात्री ११.३० च्या सुमारास मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाडीखाली लहवित येथील रेल्वे रुळावर स्वत:ला झोकून देत आत्महत्त्या केली. या प्रकरणी लहवित रेल्वे स्टेशनचे स्टेशन मास्तर रामजी बिद यांनी देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनला खबर दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रेल्वे पोलिसांच्या साथीने पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नाशिक येथे जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविले. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान, युवतीचे वडील वसंत रामकिसन सहाणे यांनी गेल्या गुरुवारीच मुलगी कल्पना बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांकडे नोंदविली होती. सकाळी महाविद्यालयात जाते असे सांगून गेलेली मुलगी रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने वडिलांनी रात्री ९.३० वाजता तक्रार दाखल केली होती. त्यानंतर दोन तासांनीच युवक व युवतीने लहवित येथे आत्महत्त्या केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार बैरागी करीत आहेत. (वार्ताहर)