शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
4
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
5
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
6
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
7
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
8
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
9
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
10
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
11
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
12
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
13
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
14
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
15
Operation Sindoor Live Updates: देशाच्या विविध भागांत मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊट
16
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
17
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
18
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
19
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!
20
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?

प्रेमीयुगुलाची विष पिऊन आत्महत्त्या

By admin | Updated: December 7, 2015 23:09 IST

प्रेमीयुगुलाची विष पिऊन आत्महत्त्या

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील अंबई येथील एका प्रेमीयुगुलाने विष प्राशन करून आत्महत्त्या केली. आत्महत्त्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे. सोमवारी सकाळी ७ वाजेच्या अगोदर हा प्रकार घडला असावा, असे पोलीस सूत्रांकडून कळते.अंबईजवळील नागाचा सोंडा (लग्नस्तंभ) येथील डोंगरावर ही घटना घडली. प्रेमीयुगुलाने विष प्राशन करून आत्महत्त्या केली असल्याचे शवविच्छेदन अहवालात म्हटले असल्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षक गणेश परदेशी यांनी सांगितले. मृत तरुणाचे नाव राहुल पंढरी भालेराव, रा. अंबई (२६), तर मयत तरुणीचे नाव काळाबाई भिवा लचके (२३), रा. अंबई (ता. त्र्यंबक) असे आहे. मृत राहुलचा विवाह झाला होता; मात्र पत्नी त्याच्याजवळ राहत नसल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे, विषाची बाटली अगर अन्य काही पुरावा घटना स्थळी आढळून आला नाही. याबाबतचा अधिक तपास पोलीस निरीक्षक देवीदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक गणेश परदेशी, राजू दिवटे, दोंडे, आवारे करीत आहेत. दरम्यान, या प्रकरणाची खबर सोमवारी मेटघेरा किल्ला येथील पोलीसपाटील किसन तुकाराम झोले यांनी त्र्यंबक पोलीस ठाण्यात दिली. या आत्महत्त्येमुळे तर्कवितर्क काढले जात होते. (वार्ताहर)नांदूर शिवारात बेवारस मृतदेह येवला : तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत सोमवारी (दि. ७) नगर-मनमाड रेल्वेलाईनजवळ नांदूर शिवारात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. रेल्वेलाईन किलोमीटर ४८५/२/३ जवळ नांदूर गावाच्या शिवारात अंदाजे ४५ वर्ष वयाच्या पुरुषाचा मृतदेह सापडला. अंगात सफेद, राखाडी काळे उभ्या पट्ट्याचा शर्ट, राखाडी रंगाची पॅन्ट असून, उजव्या हातावर मराठीत बापू असे नाव गोंदलेले आहे. या व्यक्तीविषयी कोणालाही माहिती असल्यास त्यांनी येवला तालुका पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक रु पचंद वाघमारे यांनी केले आहे. (वार्ताहर)