शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

शिवभोजन केंद्रास मुख्यमंत्र्यांची अचानक भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 19:04 IST

दहा दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेण्यासाठी आले असता, त्याचवेळी जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू झालेल्या शिवभोजन उपक्रमास भेट देतील, अशी अटकळ बांधण्यात आली होती

ठळक मुद्देमाहिती घेतली: दर्जा राखण्याच्या केल्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : नाशिक दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी वेळात वेळ काढून वडाळा नाका रस्त्यावरील द्वारकामाई बचत गटाच्या शिवभोजन केंद्रास भेट देऊन तेथील व्यवस्था व लाभेच्छुकांच्या चेहºयावर स्वस्त दरात भोजन मिळत असल्याचे भाव पाहून समाधान व्यक्त केले. यावेळी स्वत: ठाकरे यांनी भोजन घेत असलेल्यांशी संपर्क साधून आस्थेने विचारपूस केली. त्याच प्रमाणे केंद्र चालकांना देखील खाद्य पदार्थांचा दर्जा राखण्याच्या सूचना केल्या.

दहा दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेण्यासाठी आले असता, त्याचवेळी जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू झालेल्या शिवभोजन उपक्रमास भेट देतील, अशी अटकळ बांधण्यात आली होती व तशी तयारीही करण्यात आली होती. परंतु बैठकीच्या व्यस्ततेमुळे ठाकरे भेट देऊ शकले नव्हते. रविवारी मात्र राज्यस्तरीय वकील परिषदेच्या निमित्ताने मुख्यमंत्री ठाकरे यांचे नाशकात आगमन झाले त्यावेळी त्यांनी कार्यक्रमातून वेळात वेळ काढून वडाळा नाका रस्त्यावर सुरू करण्यात आलेल्या द्वारकामाई शिवभोजन उपाहारगृहास दुपारी बारा वाजता भेट दिली. खुद्द मुख्यमंत्री येणार असल्यामुळे पोलिसांनी उपाहारगृहाला गराडा घातला होता. तर शिवभोजन थाळी खाण्यासाठी आलेल्या ग्राहकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. मुख्यमंत्री ठाकरे यांनी थेट उपाहारगृहात जाऊन भोजन घेत असलेल्या लाभार्थ्यांना जेवणाच्या दर्जाबाबत विचारणा केली त्यावेळी सर्वांनी समाधान व्यक्त केले. त्याचबरोबर बचत गटाच्या अध्यक्षा अलका चहाळे, मंगला चहाळे यांच्याशीही संवाद साधला. यावेळी त्यांच्या समवेत माजी खासदार समीर भुजबळ, जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर, तहसीलदार पंकज पवार आदी उपस्थित होते.

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिक