शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

...असा साजरा होतो डोंग-यादेव उत्सव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 16:42 IST

सावकीला आनंदोत्सव : आदिवासी बांधवांचे कडक व्रत

ठळक मुद्देया उत्सवात आदिवासी कुटुंबातील एक व्यक्ति पंधरा दिवस सहभागी होतो. सदर उत्सव आदिवासी वस्तीच्या मध्यभागी उघड्यावर साजरा केला जातो.

खामखेडा : देवळा तालुक्यातील सावकी येथे डोंग-यादेव उत्साहात साजरा करण्यात आला. दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात आदिवासी बांधवांकडून हा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. या उत्सवामुळे आदिवासी बांधवासह ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.आदिवासी बांधवाचे हे अत्यंत कडक व्रत मानले जाते. या उत्सवात आदिवासी कुटुंबातील एक व्यक्ति पंधरा दिवस सहभागी होतो. सदर उत्सव आदिवासी वस्तीच्या मध्यभागी उघड्यावर साजरा केला जातो. या जागेवर बांबू किवा काठी उभे करून कुंपण केले जाते. त्याला एक प्रवेशद्वार असते. त्याला आदिवासी बांधव खळी असे संबोधतात. या खळीच्या मध्यभागी मांडव टाकला जातो. या मांडवात देवदाडा उभा करून त्यास झेंडूच्या फुलांच्या माळा बांधल्या जातात. या ठिकाणी रात्रभर जागरण करून आदिवासी बांधव लयबद्ध चालीवर नाचतात. यावेळी देवदेवतांचे कथन केले जाते. त्यासाठी थाळी हे वाद्य लावण्यात येते.उत्सवात सहभागी झालेल्या व्यक्तींना भाया म्हणून संबोधले जाते. या लोकांना पहाटे लवकर उठून थंड पाण्याने अंघोळ करावी लागते. दिवसभर परिसरातील गावागावात जाऊन प्रत्येकाच्या घरासमोर डोंग-या देवाच्या नावाचा गोल फेरा धरून नाचत शिधा म्हणून धान्य मागितले जाते. दिवसभर फिरून झाल्यावर रात्री पुन्हा आदिवासी बांधव आपल्या खळीवर येतात. सदर उत्सव पंधरा दिवस चालतो. देवाचे व्रत करणा-या या सर्व भाविकांना रात्री मक्याची कोंडी,बिगर तेलाची भाजी,ज्वारी किवा नागलीची भाकर असे भोजन दिले जाते. उत्सवाची सांगता मार्गशीष महिन्याच्या पौर्णिमेला होते. या पोर्णिमेच्या आदल्या दिवशी रात्री डोंगरातील देवतेच्या ठिकाणी गड घेण्यासाठी जातात. या ठिकाणी रात्री कोंबडा सोडला जातो. ज्या ठिकाणी गड असतो.तेथील गुहेला रात्री बांबूच्या काठ्या लावल्या जातात. पोर्णिमेच्या दिवशी गुहा उघडली जाते. पाच भाया आत मध्ये जाऊन तेथील देवतांचे पूजन करून गडामधून पाण्याचा हंडा भरून आणतात. त्या नंतर प्रसादाचा कार्यक्र म ठेवला जातो.

टॅग्स :Nashikनाशिक