शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
3
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
4
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
5
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
6
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
7
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
8
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
9
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
10
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
11
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
12
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
13
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
14
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
15
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
16
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
17
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
18
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
19
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
20
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले

यशवंतराव चव्हाण व्याख्यानमाला सटाणा महाविद्यालयात यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 20:54 IST

सटाणा : येथील महाविद्यालयात बहि:शाल शिक्षण मंडळ, सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवशीय यशवंतराव चव्हाण व्याख्यानमाला नुकतीच संपन्न झाली.

ठळक मुद्दे विद्यार्थ्यांना शालेय आणि समाजातील अन्य विषयांची माहिती मिळण्यासाठी या व्याख्यानमालेचे आयोजन

सटाणा : येथील महाविद्यालयात बहि:शाल शिक्षण मंडळ, सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवशीय यशवंतराव चव्हाण व्याख्यानमाला नुकतीच संपन्न झाली.व्याख्यानमालेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे यांनी केले. याप्रसंगी ते म्हणाले की, बहि:शाल या शब्दाचा अर्थ शाळाबाहेरील शिक्षण असा आहे. विद्यार्थ्यांना शालेय आणि समाजातील अन्य विषयांची माहिती मिळण्यासाठी या व्याख्यानमालेचे आयोजन विद्यापीठातर्फे केले जाते असे स्पष्ट केले.या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प वसंत सोनवणे यांनी गुंफले. ‘संत गाडगेबाबा जीवन कार्य’ या विषयावर बोलताना ते म्हणाले की, संत गाडगे बाबांनी समाजात असलेल्या अंधश्रद्धा, रुढी, परंपरा या अज्ञानामुळे पाळल्या जातात. समाजातील अज्ञान दूर होण्यासाठी भजन, किर्तनाच्या माध्यमातून त्यांनी समाज प्रबोधन केले.दुसरे पुष्प डॉ. निवास पाटील यांनी ‘परग्रहावरील सजीवसृष्टी’ या विषयावर गुंफले. त्यांनी सुर्यमालेतील नऊ ग्रहांची माहिती दिली व मंगळ या ग्रहावर सजीवसृष्टी असू शकते. त्या दिशेने संशोधन सुरु आहे. हे स्पष्ट केले. कंकनाकृती सूर्य ग्रहणाची सविस्तर माहिती चित्रफिती द्वारा विद्यार्थ्यांसमोर मांडली.सदर व्याख्यानमालेतील तृतीय पुष्प प्रा. हेमंत टिळे यांनी ‘हुतात्मा अनंत कान्हेरे’ या विषयावर गुंफले. ते म्हणाले की हुतात्मा अनंत कान्हेरे भारतीय स्वातंत्र्य लढयातील सशस्त्र क्र ांतिकारक होते. अभिनव भारत या क्र ांतिकारक संघटनेचे ते सदस्य होते. नाशिकचा कलेक्टर ए. एम. टी. जॅक्सन याची गोळया मारु न हत्या करणारे ते क्र ांतिकारक होते.व्याख्यानमाला यशस्वी करण्यासाठी प्रा. निलेश पाटील, डॉ. दीपा कुचेकर, प्रा. धनंजय पंडित, प्रा. लक्ष्मण सुर्यवंशी, प्रा. युवराज गातवे, प्रा. वैशाली बागुल, के. एल. आहेर व विद्यार्थी वर्ग उपस्थित होता. 

टॅग्स :Studentविद्यार्थीcollegeमहाविद्यालय