शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

मेहनतीला मार्गदर्शनाची जोड मिळाल्यास यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 00:11 IST

परिस्थितीची जाणीव ठेवून जीद्द व मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शनाची जोड मिळाल्यास यश हमखास मिळते, असे प्रतिपादन जनता एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र देसले यांनी केले. झोडगे परिसरातील तरुण सैन्य दल व प्रशासकीय सेवेत दाखल झाले आहेत. अशा विद्यार्थ्यांसह विविध स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंचा सत्कार समारंभाप्रसंगी देसले बोलत होते.

झोडगे : परिस्थितीची जाणीव ठेवून जीद्द व मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शनाची जोड मिळाल्यास यश हमखास मिळते, असे प्रतिपादन जनता एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र देसले यांनी केले. झोडगे परिसरातील तरुण सैन्य दल व प्रशासकीय सेवेत दाखल झाले आहेत. अशा विद्यार्थ्यांसह विविध स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंचा सत्कार समारंभाप्रसंगी देसले बोलत होते. सैन्य दलामध्ये झोडगे येथील दिगंबर काळगुडे, हर्षल थोरकर, कुलदीप कापुरे, पृथ्वीराज सोनवणे, तर कंधाणे येथील भूषण गर्दे, समाधान जाधव, भिलकोट येथील गणेश सूर्यवंशी, अभिषेक चव्हाण, गणेश ठाकरे यांची सैन्य दलात निवड झाली आहे. राहुल देसले वनविभागात भाऊसाहेब मगर व भूषण देसले यांची रेल्वे मध्ये निवड झाली. या सर्वांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य बी. ए. पाटील उपमुख्याध्यापक एस. डी. शिदे, एम. एच. देसाई, व्ही. बी. देशमुख, एन.सी.सी आॅफिसर एस. बी. बाविस्कर आदी उपस्थित होते. झोडगे येथील जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात गेल्या सव्वीस वर्षांपासुन राष्ट्रीय छात्रसेनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येते. प्राचार्य मेजर बी.ए. पाटील यांनी माळमाथा परिसरातील विद्यार्थ्यांच्या शारीरिक क्षमतेचा विचार करून महाराष्ट्र ४८ बटालियन चे युनिट सुरू केले आहे.गेल्या पंचवीस वर्षांत झोडगेसह परिसरातील शेकडो तरुण सैन्य दलात भरती झाले आहेत, तर पोलीस, रेल्वे आदीसह विविध ठिकाणी नोकरी करत आहेत. सैन्य दलातील कठीण प्रशिक्षणाची पूर्वतयारी विद्यार्थ्यांकडून करून घेतली जाते. विद्यालयच्या वतीने भरतीपूर्व विविध स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन मोफत उपलब्ध करून देण्यात येते. यावेळी संदीप बाविस्कर यांनी आभार मानले.झोडगे येथील जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात सव्वीस वर्षांपासून राष्ट्रीय छात्रसेनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येते. प्राचार्य मेजर पाटील यांनी माळमाथा परिसरातील विद्यार्थ्यांच्या शारीरिक क्षमतेचा विचार करून महाराष्ट्र ४८ बटालियनचे युनिट सुरू केले आहे. परिसरातील तरुण मोठ्या प्रामाणात सैन्य दलात भरती झाले आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक