शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

प्लॅस्टिक अस्तरीकरणामुळे गळती थांबविण्यात यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2020 00:32 IST

सिन्नर : तालुक्यातील मोहदरी येथील ५० वर्षांपूर्वीच्या बंधाऱ्याची गळती थांबवण्यात प्लॅस्टिक अस्तरीकरणामुळे यश आले आहे.

सिन्नर : तालुक्यातील मोहदरी येथील ५० वर्षांपूर्वीच्या बंधाऱ्याची गळती थांबवण्यात प्लॅस्टिक अस्तरीकरणामुळे यश आले आहे. त्यामुळे पाणीसाठा टिकून राहण्याबरोबरच परिसरातील भूजल पातळीवाढीस मोठी मदत झाली आहे. प्लॅस्टिक अस्तरीकरणाच्या या पथदर्शी उपक्रमाने मोहदरी, मोह या गावांतील शेती सिंचनालाही फायदा होणार आहे. या वाढलेल्या पाणीसाठ्याचे जलपूजन करण्यात आले.  खासदार हेमंत गोडसे, माजी आमदार राजाभाऊ वाजे, युवा नेते उदय सांगळे, जिल्हा परिषद सदस्य सुनीता संजय सानप, पंचायत समितीचे उपसभापती संग्राम कातकाडे, सदस्य भगवान पथवे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख दीपक खुळे, तालुकाप्रमुख सोमनाथ तुपे, संजय सानप, गणेश आव्हाड, सुभाष लांडगे, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष शीतल सांगळे, सदस्य सुनीता संजय सानप यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले.  गळती थांबल्याने बंधाऱ्यात १५ दलघफू पाणीसाठा होणार आहे. परिसरातील ५०हून अधिक विहिरींची भूजल पातळी वाढण्यास मदत होऊ शकेल, तर १५०हून अधिक एकर शेती सिंचनाला फायदा होईल. पाणी टिकून राहणार असल्याने टंचाई स्थितीवरही मोठ्या प्रमाणात मात करता येणार आहे. यावेळी अरुण बिन्नर, अशोक बिन्नर, कैलास बिन्नर, मदन बिन्नर, लक्ष्मण बिन्नर, शांताराम बिन्नर, दिलीप बिन्नर, निवृत्ती होलगीर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.----एक कोटी ९३ लाखांची विकासकामेमाजी आमदार राजाभाऊ वाजे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, सुनीता सानप यांच्या निधीतून मुख्यमंत्री पेयजल योजनेतून वाड्यावस्त्यांसह गावाला पाणीपुरवठा, स्मशानभूमी शेड, रस्ते कॉंक्रिटीकरण, सभामंडप, व्यायामशाळा, शाळा दुरुस्ती, पेव्हर ब्लॉक आदी एक कोटी ९३ लाख रुपयांच्या कामांचे लोकार्पण करण्यात आले.

टॅग्स :Nashikनाशिक