शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

आॅपरेशन गोमाता यशस्वी...

By admin | Updated: May 7, 2017 01:16 IST

परिसरातून एक गोमाता एका चेंबरवरील स्लॅबवर पोहचली. सदर स्लॅब जीर्ण झालेला असल्याने गायीच्या वजनाने तो धसला आणि गाय चेंबरमध्ये कोसळली.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : वेळ दुपारी साडेचार वाजेची. ठिकाण पोलीस मुख्यालय वसाहत. परिसरातून एक गोमाता रणरणत्या उन्हात सावलीच्या शोधात जात असताना अचानकपणे एका चेंबरवरील स्लॅबवर पोहचली. सदर स्लॅब जीर्ण झालेला असल्याने गायीच्या वजनाने तो धसला आणि गाय चेंबरमध्ये कोसळली. ‘रेस्क्यू’साठी परिसरातील रहिवाशांनी अग्निशमन दलाला ‘कॉल’ दिला.पोलीस वसाहतीमधून मार्गस्थ होणारी गाय अचानकपणे चेंबरचा स्लॅब धसल्याने चेंबरमध्ये कोसळली. यावेळी गायीच्या अंगावर सीमेंटचे तुकडे पडले आणि सुमारे चार फुटापेक्षा अधिक मोठे चेंबर असल्याने गायीला धसलेल्या स्लॅबच्या खड्ड्यातून पुन्हा बाहेर येणे अवघड झाले होते. त्यामुळे ती जोरजोराने हंबरडा फोडत होती. यावेळी परिसरातील युवक, महिला चेंबरभोवती जमा झाले आणि त्यांनी उन्हाची तीव्रता लक्षात घेता तातडीने अग्निशामक केंद्राला मदतीसाठी बोलाविले. घटनेची माहिती मिळताच तातडीने शिंगाडा तलाव येथील मुख्यालयामधून ‘रेस्क्यू व्हॅन’सह अग्निशामक दलाचे जवान पोलीस मुख्यालयाच्या दिशेने मार्गस्थ झाले.