दहावीच्या परीक्षेत पिता-पुत्राचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2020 10:50 PM2020-07-31T22:50:49+5:302020-08-01T01:07:57+5:30

देवगाव : शिक्षणाला वय नसते आणि शिक्षण केव्हाही घेतले तरी ते वाया जात नसते या उक्तीप्रमाणे देवगाव परिसरातील बरड्याचीवाडी येथील लक्ष्मण देहाडे व समीर लक्ष्मण देहाडे या पिता-पुत्राने दहावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले.

Success of father and son in 10th standard examination | दहावीच्या परीक्षेत पिता-पुत्राचे यश

लक्ष्मण देहाडे, समीर देहाडे

Next

देवगाव : शिक्षणाला वय नसते आणि शिक्षण केव्हाही घेतले तरी ते वाया जात नसते या उक्तीप्रमाणे देवगाव परिसरातील बरड्याचीवाडी येथील लक्ष्मण देहाडे व समीर लक्ष्मण देहाडे या पिता-पुत्राने दहावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले. लक्ष्मण मुरलीधर देहाडे हे शेतमजूर असून, गेल्या २७ वर्षांपूर्वी १९९३ साली दहावीच्या परीक्षेत गणित व इंग्रजी या विषयात अनुत्तीर्ण झाले होते. परंतु शिक्षणाची प्रचंड ओढ आणि मुलांच्या आग्रहाखातर त्यांनी वयाच्या ४३व्या वर्षी गणित व इंग्रजी या विषयांचे शिखर पार केले. मुलगा समीर लक्ष्मण देहाडे याने ग्रामोदय शिक्षण संचलित आदर्श माध्यमिक विद्यालय सामुंडी येथील विद्यालयातून ७४ गुण मिळवले. पिता-पुत्रांना डॉ. चंद्रमणी मोहिते यांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: Success of father and son in 10th standard examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.