शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

सीमेंट खरेदी बंद आंदोलनाला यश

By admin | Updated: August 7, 2014 01:57 IST

सीमेंट खरेदी बंद आंदोलनाला यश

नाशिक : सीमेंट कंपन्यांनी कुठलेही कारण नसताना प्रतिगोणी तब्बल शंभर रुपयांच्या आसपास केलेल्या दरवाढीच्या निषेधार्थ क्रेडाई व बिल्डर्स असोसिएशनने पुकारलेल्या सीमेंट खरेदी बंद आंदोलनाला यश आले आहे. सीमेंट कंपन्यांनी दरवाढ मागे घेत, आंदोलन स्थगित करण्याचे आवाहन केले आहे. महिनाभरापूर्वी सीमेंट उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी ३० ते ३५ टक्के दरवाढ केल्याने २५० रुपयाला मिळणाऱ्या गोणीची किंमत ३६० रुपयांवर पोहचली होती. कंपन्यांनी अचानक केलेल्या या दरवाढीमुळे शहरात सुरू असलेल्या विविध विकासकामांवर त्याचा परिणाम झाला होता. दरम्यान, सीमेंट कंपन्यांनी केलेली ही दरवाढ कृत्रिम असून, त्यामुळे विकासकांना प्रचंड तोटा सहन करावा लागत असल्याचा सूर व्यक्त करीत क्रेडाईने आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. पुढे बिल्डर्स असोसिएशन आॅफ इंडियाला सोबत घेऊन राज्यभर आंदोलन छेडले. पहिल्या टप्प्यात सीमेंट खरेदी बंद आंदोलन करण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात थेट काम बंद आंदोलन छेडत सरकारने या प्रकरणी लक्ष केंद्रित करण्याचे प्रयत्न केले गेले. तसेच केंद्र व राज्यमंत्र्यांना भेटून कंपन्यांबाबत निश्चित धोरण जाहीर करण्याची मागणीही केली. अखेर क्रेडाई व बीआयएच्या आंदोलनाची दखल घेत सीमेंट कंपन्यांना दरवाढ मागे घ्यावी लागल्याची माहिती क्रेडाईचे नाशिकचे अध्यक्ष जयेश ठक्कर व बिल्डर्स असोसिएशन आॅफ इंडिया नाशिकचे अध्यक्ष विलास बिरारी यांनी दिली. (प्रतिनिधी)