शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

दुर्मीळ उदमांजराला पकडण्यात यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 13:12 IST

येवला : शहरानजीक असलेल्या रेल्वे स्थानकासमोर एका शेतात दुर्मीळ अशा उदमांजराला पकडण्यात प्राणिमित्रास यश आले असून, या उदमांजरास वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे.

येवला : शहरानजीक असलेल्या रेल्वे स्थानकासमोर एका शेतात दुर्मीळ अशा उदमांजराला पकडण्यात प्राणिमित्रास यश आले असून, या उदमांजरास वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे.रेल्वे स्थानकासमोरील योगेश शिंदे यांच्या शेतात सोमवारी (दि.२५) सायंकाळी एक दुर्मीळ उदमांजर अन्न पाण्याच्या शोधात आले. ह्यावेळी शिंदे यांचे कुटुंबीय शेतात काम करीत असताना त्यांना ते दिसले. रानमांजर आहे असे समजून सर्वांनी त्याला हाकलण्याचा प्रयत्न केला, परंतु ते मांजर शेतातील सीमेंटच्या पाइपमध्ये शिरले. ते बाहेर येत नसल्याने शिंदे कुटुंबीयांनी शहरातील प्राणिमित्र संजय लाहुरे यास फोन करून बोलाविले. लाहुरे यांनी पाइपजवळ जाऊन त्यास पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु बराच वेळ होऊनही त्या उदमांजरास पकडण्यात यश मिळत नव्हते. अखेरीस प्राणिमित्र लाहुरे यांनी त्यांच्याजवळ असलेला पिंजरा आणून त्या ठिकाणी लावला आणि रात्री उशिरापर्यंत त्याला पकडण्यात आले. यावेळी सोमनाथ गुंड, जगदीश भालेरे, कृष्णा गाडेकर, निखिल परदेशी, योगेश लुळेकर, आकाश परदेशी, योगेश शिंदे आदींचे सहकार्य लाभले. या घटनेची वनविभागास माहिती देण्यात आल्यानंतर वनविभागाचे दामोदर अहिरे, पंकज नागपुरे व के.के. गायकवाड हे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी उदमांजरास ताब्यात घेऊन जंगलात सुरक्षितस्थळी सोडून दिले.---------------------उदमांजर हा प्राणी प्रामुख्याने रात्री वावरतो. जंगलात बीळ करून राहणारा हा प्राणी सस्तन व मांसाहारी प्राणी असून, उंदरासारखे लहान प्राणी, पक्षी, कीटक हे त्याचे खाद्य आहे. बदलत्या हवामानामुळे हे उदमांजर शहराकडे आले असावे.- संजय लाहुरे, प्राणिमित्र, येवला

टॅग्स :Nashikनाशिक