शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याला जेरबंद करण्यात यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 16:11 IST

सिन्नर : भक्ष्याचा शोध घेत असतानाच बिबट्याच कांदा चाळीत अडकून पडला होता. त्यानंतर चोवीस तासांनी सदरचा बिबट्या वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अलगद जेरबंद झाल्याची घटना सिन्नर तालुक्यातील ठाणगाव परिसरातील आडवाडी शिवारात शुक्र वारी (दि. २६) मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देरात्रीच त्याठिकाणी वन कर्मचारी दाखल

सिन्नर : भक्ष्याचा शोध घेत असतानाच बिबट्याच कांदा चाळीत अडकून पडला होता. त्यानंतर चोवीस तासांनी सदरचा बिबट्या वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अलगद जेरबंद झाल्याची घटना सिन्नर तालुक्यातील ठाणगाव परिसरातील आडवाडी शिवारात शुक्र वारी (दि. २६) मध्यरात्रीच्या सुमारास घडली.तालुक्यातील आडवाडी येथून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या अण्णा बिन्नर यांच्या गट नंबर ३३१ मध्ये घडली. बिन्नर कुटुंबिय नेहमीप्रमाणे वस्तीवर झोपी गेले होते. गुरु वारी (दि.२५) मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास बिबट्याने वस्तीवरील कुत्र्यांवर हल्ला चढवला. घराबाहेर आवाज झाल्याने कुटंबिय जागे झाले असता घरासमोरील कांदा चाळीत बिबट्याने प्रवेश केल्याचे पाहिले. बिन्नर यांनी चाळीचा दरवाजा बाहेरून बंद केला. व रात्र्ीच वस्तीवर बिबट्या आल्याची माहिती वनविभागाला दिली. रात्रीच त्याठिकाणी वन कर्मचारी दाखल झाले होते.कांदा चाळीत गवत व लाकडाचे सरपण असल्याने तसेच चारही बाजूंनी चाळीला सरंक्षण असल्याने बिबट्या आतमध्ये लपून बसला. त्यामुळे बिबट्याला बाहेर पडणे अवघड झाले होते. दुसºया दिवशी सकाळी म्हणजे शुक्र वारी (दि. २६) नाशिक वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक आर. टी. मगदुम, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण सोनवणे, नांदूरशिंगोटेचे वनपरिमंडळ अधिकारी प्रितेश सरोदे यांनी आडवाडी येथे घटनास्थळी धाव घेतली. वन अधिकार्यांनी परिसराची पाहणी केली असता कांदा चाळ चारही बाजूंनी बंदिस्त असल्याने मुख्य दरवाजा जवळ पिंजरा लावण्यात आला. वनविभागाच्या कर्मचार्यांनी दिवसभर या भागात तळ ठोकून होते. बिबट्याला बाहेर आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले पंरतु दिवसभर बिबट्या पिंजºयात अडकला नाही. शुक्र वारी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास अखेर बिबट्या पिंजºयात अडकला गेला. त्यामुळे वनविभाग व परिसरातील नागरीकांनी सुटकेचा निश्वास सोडला. सदर बिबट्या सुरक्षित असून अंदाजे तीन वर्षे वयाचा आहे. मोहदरी येथील वन उद्यानात बिबट्याला ठेवण्यात आले आहे. यावेळी कोनांबे परिमंडळाचे वनपाल पी. के. आगळे, रोहित शिंदे, किरण गोराडे, आकाश रु पवते, कैलास सदगीर आदी उपस्थित होते. 

टॅग्स :forestजंगलleopardबिबट्या