नाशिक : मुलीसोबत असभ्य वर्तनाचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या दोघांना टोळक्याने मारहाण केल्याची घटना उपनगर परिसरात घडली़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार टाकळीरोडवरील दसक येथील एका मुलीसमवेत संशयित अभिजित रंजित नानक याने असभ्य वर्तन केले़ या प्रकाराचा जाब विचारण्यासाठी मुलीचे वडील, काका, व भाऊ गेले होते़ त्यांना संशयित नानक याने आपले साथीदार दीपक राजेश बाविस्कर, राजविकास शेलगीर (रा़ श्रमिकनगर, पगारे मळा, उपनगर) व चिंटू इंदर नानक यांच्यासह मारहाण केली़ तसेच दगडफेक करून पळ काढला़या प्रकरणी मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून उपनगर पोलिसांनी चौघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे़
उपनगरला टोळक्याकडून मारहाण
By admin | Updated: March 14, 2017 21:05 IST