शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकट; KL राहुलनं एक कॅच सोडला
4
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
5
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
6
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
7
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
8
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
9
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
10
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
11
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
12
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
13
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
14
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
15
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
16
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
17
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
18
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
19
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल

भुयारी मार्गामध्ये साचले डबके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 00:31 IST

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कमोदनगर आणि स्टेट बँक चौक याठिकाणी, कोट्यवधी रुपये खर्च करून भुयारीमार्ग तयार केला, परंतु या भुयारी मार्गात पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले दिसून येत आहे.

इंदिरानगर : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कमोदनगर आणि स्टेट बँक चौक याठिकाणी, कोट्यवधी रुपये खर्च करून भुयारीमार्ग तयार केला, परंतु या भुयारी मार्गात पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले दिसून येत आहे. अल्को मार्केट ते स्टेट बँक चौक भुयारी मार्गामध्ये पावसाच्या पाण्याचे डबके साचले आहे. त्यामुळे भुयारीमार्ग शोभिवंत वस्तू बनून राहिली आहे.या ठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती होऊन या परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होईल, याकरिता संबंधित अधिकऱ्यांकडून या कामाची दखल घेऊन ताबडतोब योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्या, अशी मागणी होत आहे.मुंबई-आग्रा महामार्गापासून आजूबाजूस राहणारे स्थानिक लोक तसेच काही कामानिमित्ताने महामार्गावरून रस्त्याच्या एका बाजूने दुसºया बाजूस ये-जा करणारे पादचारी यामुळे वाहतुकीस अडथळा येत होता तसेच या भागात मोठे अपघात होऊन काही लोकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. यावर उपाय म्हणून अपघात टाळण्याकरिता तसेच पादचाऱ्यांना सहज रस्ता ओलांडता यावा याकरता कमोदनगर आणि स्टेट बँक चौक याठिकाणी भुयारी मार्ग तयार केले, परंतु या भुयारी मार्गात पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले दिसून येत आहे. नियोजनाच्या अभावामुळे कोट्यवधी रुपये पाण्यात गेल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे. या ठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती होऊन या परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे. याकरिता संबंधित अधिकाºयांकडून या कामाची दखल घेऊन ताबडतोब योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी होत आहे. त्यामुळे भुयारी मार्गाचा नागरिकांना वापर करता येत नाही त्यामुळे नागरिक उड्डाणपुलावरूनच मार्गक्रमण करीत आहे. त्यामुळे अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तातडीने भुयारी मार्गातील पावसाचे पाणी काढून त्या ठिकाणी पुन्हा पावसाचे पाणी साचणार नाही याची उपाययोजना करण्याची मागणी नीलेश साळुंखे, महेश चव्हाण, विशाल मराठे, अजय पाटील, प्रवीण पवार, कुणाल पाटील, संदीप साळुंखे, राहुल काळे यांनी केला आहे.उड्डाणपुलावरून पादचाºयांचे मार्गक्रमणअल्को मार्ग परिसरातील आणि सिडको परिसरातील नागरिकांची उड्डाणपूल झाल्यापासून गैरसोय झाली होती. त्यामुळे नागरिक जीव धोक्यात घालून उड्डाणपुलावरून मार्गक्र मण करीत होते. त्यामुळे लहान-मोठ्या अपघाताची संख्या वाढली होती. नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन अल्को मार्केट ते स्टेट बँक चौक असा भुयारी मार्ग तयार करण्यात आला. परंतु पहिल्याच पावसात भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहेत. तसेच या पाण्यात शेवाळ मोठ्या प्रमाणात साचले आहे.भुयारी मार्गात टवाळखोरांचा वावरअपघात होऊन जीवितहानी झाल्यास त्याची जबाबदारी महामार्ग प्राधिकरणावर राहील, असे नागरिकांचे म्हणणे आहे. भुयारी मार्गाबाबत करण्यात आलेले नियोजन हे एकप्रकारे चुकीचे दिसून येत आहे. त्यामुळे हा भुयारी मार्ग पादचाºयांसाठी निरु पयोगी ठरत आहे. या भुयारी मार्गात सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या दिसून येत नाही. त्यामुळे हा भुयारी मार्ग टवाळखोरांचा अड्डा होऊ पाहत आहे. या ठिकाणी आपल्याला जागोजागी मद्याच्या बाटल्या पडलेल्या दिसून येतात. या ठिकाणी सुरक्षिततेच्या बाबतीत काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत, पादचाºयांना कितपत उपयोग होणार आहे, याबाबत कधी दाखल घेतली गेलेली दिसून येत नाही.

टॅग्स :WaterपाणीTrafficवाहतूक कोंडी