शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

उपकेंद्राचे लवकरच  सिडको भागात स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 00:19 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उपकेंद्र कार्यालयाच्या इमारतीचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून, विद्यापीठ प्रशासनाने सिडकोतील शाळा क्रमांक ६८ मधील जागेसाठी महापालिकेकडे प्रस्ताव सादर केलेला प्रस्ताव मंजूर झाला

नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उपकेंद्र कार्यालयाच्या इमारतीचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून, विद्यापीठ प्रशासनाने सिडकोतील शाळा क्रमांक ६८ मधील जागेसाठी महापालिकेकडे प्रस्ताव सादर केलेला प्रस्ताव मंजूर झाला असून, त्यामुळे विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी प्रशस्त जागा उपलब्ध झाली आहे.शहरातील तिबेटियन मार्केट येथील जुन्या इमारतीमध्ये उपकेंद्राचे कार्यालय कार्यरत आहे. येथे पार्किंगसह अन्य सोयी-सुविधांच्या अभावामुळे विद्यापीठाचे विविध अभ्यासक्रम चालविण्यासाठी अनेक मर्यादा आहेत.  प्रशासकीय कामकाजाची पूर्तता करण्यात अडचणी येत असल्याने विद्यापीठ प्रशासनाने नवीन पर्यायी जागा शोधण्याची मोहीम सुरू केली होती. यात प्रारंभी नाशिकरोड परिसरातील एका इमारतीविषयी कार्यवाही सुरू होती.  परंतु कार्यालय स्थलांतरणास विद्यार्थी संघटनांकडून विरोध झाल्याने सिडकोतील मनपा शाळेच्या जागेविषयी विद्यापीठ प्रशासनाने महापालिकेला प्रस्ताव पाठविला होता.  परंतु, संबंधित प्रस्ताव तांत्रिक बाबींमध्ये अडकल्याने उपकेंद्राचे कार्यालय आहे, त्याच ठिकाणी सुरू ठेवण्याची नामुष्की विद्यापीठ प्रशासनावर आली होती. त्यासोबतच सिडकोतील जागा उपलब्ध होण्याच्या अपेक्षेने विद्यापीठातर्फे सुरू करण्यात आलेला एमबीएचा अभ्यासक्रम चालविण्याचे आव्हानही प्रशासनासमोर उभे राहिले होते.पुन्हा ऊर्जितावस्था प्राप्त होणारअनेक अडचणीतून सद्यस्थितीत मार्ग निघाला असून, महापालिके ला शाळा क्रमांक ६८च्या जागेसाठी पाठविलेला प्रस्ताव गेल्या सप्ताहात मंजूर झाल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने शाळेच्या जागेचा ताबा घेऊन त्याठिकाणी देखभाल दुरुस्तीच्या कामांना सुरुवात केली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत या नवीन जागेवर विद्यापीठ उपकेंद्र सुरू होणार असल्याने विद्यापीठ उपकेंद्राला पुन्हा ऊर्जितावस्था प्राप्त होण्यास मदत मिळणार आहे.

टॅग्स :universityविद्यापीठNashikनाशिक