शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

उपसमिती गठित : तूर्त जुन्या करारनाम्यानुसारच भाडेआकारणीचा निर्णय महापालिका गाळ्यांचे फेरसर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2018 00:54 IST

नाशिक : महापालिकेच्या मालकीच्या गाळेभाडे आकारणीसंबंधी सुरू असलेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी महापौरांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक होऊन गाळ्यांचे फेरसर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला.

ठळक मुद्देकरारनाम्यानुसारच भाडेआकारणी गाळेधारकांसमवेत बैठक

नाशिक : महापालिकेच्या मालकीच्या गाळेभाडे आकारणीसंबंधी सुरू असलेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी महापौरांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक होऊन गाळ्यांचे फेरसर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी प्रशासनातील अधिकाºयांची उपसमिती गठित करून त्यांना महिनाभरात अहवाल सादर करण्याचे आदेश महापौर रंजना भानसी यांनी दिले. दरम्यान, ३१ मार्च २०१७ पर्यंत तूर्त जुन्या करारनाम्यानुसारच भाडेआकारणी करण्याचेही निश्चित करण्यात आले. महापालिकेने आपल्या मालकीच्या गाळ्यांमध्ये अडीच वर्षांपूर्वी रेडीरेकनरनुसार भाडेदरवाढ केली होती. सदर दरवाढ ही अन्याय्य असल्याचे सांगत गाळेधारकांच्या संघटनेने त्यास विरोध दर्शविला आहे. सदर दरवाढ रद्द करावी अथवा पूर्वलक्षी प्रभावाने ती लागू करण्यात येऊ नये, अशी मागणी गाळेधारकांनी केली आहे. त्यासाठी गेल्या दीड-दोन वर्षांपासून संघटना लढा देत आहे. दरम्यान, मागील सप्ताहात मंत्रालयात आमदार सीमा हिरे यांच्या पुढाकाराने नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्याकडे गाळेधारकांसमवेत बैठक होऊन चर्चा झाली होती. या चर्चेत महापौरांच्या अध्यक्षतेखाली गठित समितीने निर्णय घेण्याच्या सूचना राज्यमंत्र्यांनी केल्या होत्या. त्यानुसार, गुरुवारी (दि.२५) महापौर रंजना भानसी यांनी समितीची बैठक बोलाविली होती. यावेळी सर्वपक्षीय गटनेते, स्थायी समिती सभापती व सभागृहनेता आदी उपस्थित होते. बैठकीत, गाळ्यांचे फेरसर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी उपआयुक्त कर यांचेसह बांधकाम, विविधकर आणि नगररचना विभागाच्या अधिकाºयांची उपसमिती गठित करण्यात आली. या समितीने महिनाभरात फेरसर्वेक्षण करत अहवाल सादर करावा, असे आदेश महापौरांनी दिले. तसेच गाळेधारकांना मूलभूत सोयीसुविधा पुरविण्यावरही चर्चा झाली. त्यासाठी बांधकाम, विद्युत, आरोग्य, पाणीपुरवठा या विभागाच्या अधिकाºयांची समिती गठित करून गाळेधारकांना त्या-त्या सुविधा पुरविण्याची जबाबदारी विविध कर विभागाने महिनाभरात पार पाडावी, असे आदेश देण्यात आले. दरम्यान, गाळेधारकांना त्यांच्या जुन्या करारनाम्यानुसार ३१ मार्च २०१७ पर्यंत भाडेआकारणी करण्याचेही ठरविण्यात आले. तसेच २०१४ ते ३१ मार्च २०१७ या कालावधीपर्यंत गाळेधारकांनी मालमत्ता कर भरावा, असेही आदेशित करण्यात आले. फेरसर्वेक्षणाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढच्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार असल्याचे महापौर रंजना भानसी यांनी सांगितले.बंद दाराआड खलगाळेधारकांच्या प्रश्नी पदाधिकाºयांनी बंद दाराआड चर्चा केली. समितीच्या बैठकीला माध्यमांच्या प्रतिनिधींना प्रवेश नाकारण्यात आला आणि महापौरांचे नाव त्यासाठी जाणीवपूर्वक पुढे करण्यात आले. मात्र, सद्यस्थितीत सत्ताधारी भाजपात धुडगूस घालणाºया दोघा पदाधिकाºयांनीच माध्यमांना दूर ठेवण्याचा डाव रचल्याचे स्पष्ट झाले. महापौरांना अडचणीत आणण्याची ही खेळी असल्याचे नंतर महापौरांच्याही लक्षात आले. पारदर्शी कारभाराचा दावा करणाºया सत्ताधारी भाजपातील काही उपद्रवी पदाधिकाºयांमुळे पक्ष मात्र अडचणीत येऊ पाहत आहे.