शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

समाज-संस्कृती संवर्धनासाठी संविधानाचा अभ्यास आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 16:59 IST

स्वरा पारखी : कळवणला व्याख्यानमालेचा समारोप

ठळक मुद्दे व्याख्यानमालेत सरकारी वकील अ‍ॅड. एस. जी. पाटील , अ‍ॅड.नानासाहेब पगार ,पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ , न्यायाधिश अमृता जोशी यांची व्याख्याने झाली.

कळवण : समाज आणि संस्कृती संवर्धनासाठी भारतीय संविधानाचा अभ्यास आवश्यक असून त्यातून जगण्याचा मार्ग अधिक सुकर होऊ शकेल, असे प्रतिपादन कळवण न्यायालयाच्या न्यायाधिश स्वरा पारखी यांनी व्याख्यानमालेच्या समारोपप्रसंगी बोलताना केले.कळवण तालुका विधी सेवा प्राधिकरण, कळवण तालुका वकील संघ आणि कळवण एज्युकेशन सोसायटी संचलित, कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘भारतीय संविधान’ या विषयावर पाच दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. व्याख्यानमालेच्या पाचव्या दिवशी न्यायाधीश स्वरा पारखी यांनी कलम ३९ अ आणि ५१ अ या विषयावर व्याख्यान दिले. अध्यक्षस्थानी कळवण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. शशिकांत पवार उपस्थित होते. न्यायाधीश स्वरा पारखी यांनी राज्यघटनेतील कलम ५१ अ स्पष्ट करताना कलमाअंतर्गत येणारे मूलभूत कर्तव्ये आपल्या रोजच्या जीवनात अनुभवास येणाऱ्या अनेकविध उदाहरणातून स्पष्ट केले. अध्यक्षीय मनोगतात अ‍ॅड.शशिकांत पवार यांनी भारतीय संविधानाची ओळख करून देण्यासाठी या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असून या व्याख्यानमालेचा आजच्या तरु ण पिढीला त्यांच्या जीवनात निश्चित लाभ होईल असे मत व्यक्त केले . या व्याख्यानमालेत सरकारी वकील अ‍ॅड. एस. जी. पाटील , अ‍ॅड.नानासाहेब पगार ,पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ , न्यायाधिश अमृता जोशी यांची व्याख्याने झाली.कार्यक्र मास संस्थेचे सरचिटणीस बेबीलाल संचेती , विश्वस्त राजेंद्र भामरे, अ‍ॅड.सुभाष शिंदे , अ‍ॅड.संजय पवार , महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.सौ. उषाताई शिंदे , उपप्राचार्य प्रा. डॉ.एन.के.आहेर , प्रा. राजेंद्र कापडे , प्रा. डॉ. बी. एस. पगार आदी उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा. योगेंद्र ठाकरे यांनी केले तर संयोजन अ‍ॅड. संजय बोरसे यांनी केले.

टॅग्स :NashikनाशिकCourtन्यायालय