शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनाचे धान्य वाटप करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 23:38 IST

नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळांना सुट्या जाहीर करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना शाळेमध्ये मध्यान्ह भोजनासाठी दिले जाणारा पोषण आहार शाळांच्या पातळीवर पडून असल्याची बाब लक्षात आल्याने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सदरचे धान्य विद्यार्थ्यांना वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेचा निर्णय । शालेय स्तरावर गर्दी टाळण्याच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळांना सुट्या जाहीर करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना शाळेमध्ये मध्यान्ह भोजनासाठी दिले जाणारा पोषण आहार शाळांच्या पातळीवर पडून असल्याची बाब लक्षात आल्याने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सदरचे धान्य विद्यार्थ्यांना वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. शालेय पातळीवरच याचे वाटप होणार असले तरी, वाटपाच्या वेळी विद्यार्थी व पालकांनी गर्दी टाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारत देशासह संपूर्ण महाराष्ट्र राज्यात लॉकडाउन करण्याचा निर्णय केंद्र व राज्य सरकारने घेतला आहे. त्यात गर्दी टाळण्यासाठी १६ मार्चपासूनच शाळा, अंगणवाड्या, महाविद्यालयांना सुट्या जाहीर करण्यात आल्या आहेत.शाळा बंद झाल्याने विद्यार्थी मध्यान्हातील पोषण आहारापासून वंचित राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने देशातील शालेय विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्याचे आदेश सरकारला दिले असून, शालेय विद्यार्थ्यांचे कुपोषण रोखण्यासाठी शालेय स्तरावर शिल्लक असलेला तांदूळ व कडधान्यसाठा शालेय विद्यार्थ्यांना वाटप करण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्णातील हंगामी वसतिगृह व शाळांमध्ये शिल्लक असलेला धान्य साठा वाटप करण्याचे आदेश नाशिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिले आहेत.धान्य वाटप करत असताना शासनाने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेची सक्तीने पालन करण्याची खबरदारी शालेय व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक व पोषण आहार कामकाज पाहणारे शिक्षकांनी घ्यावी. शालेय स्तरावर धान्य व कडधान्य वाटप करण्याबाबत पूर्व कल्पना पोलीस विभाग व तालुकास्तरावर तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका पोलिसांना देण्यात येऊन याबाबत सर्व निर्णय घेण्याचे अधिकार शालेय व्यवस्थापन समितीस देण्यात आल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिली. एक मीटरपेक्षा जास्त अंतर हवेशालेय स्तरावर उपलब्ध असलेला धान्य व कडधान्य शाळेचे मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती तथा पोषण आहाराचे काम पाहणारे शिक्षकांनी सर्व विद्यार्थी तथा पालक यांना समप्रमाणात वाटप करावे त्याचबरोबर शाळास्तरावर धान्य वाटप करण्यात येणार असल्याबाबत प्रसिद्धी करण्यात यावी व शालेय स्तरावर धान्य घेण्यासाठी एकाच दिवशी विद्यार्थी व पालक यांची गर्दी होणार नाही यासाठी टप्प्या टप्प्याने वाटप करण्यात यावे, विद्यार्थी व पालक धान्य घेण्यास आल्यास त्यांच्यातील एकमेकांपासूनचे अंतर एक मीटरपेक्षा जास्त राहील याची काळजी घेण्यात यावी.

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाStudentविद्यार्थी