शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

धबधब्यात उडी मारून विद्यार्थिनीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 01:27 IST

सुरगाणा तालुक्यातील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा आंबेपाडा (बे.) येथील दहावीच्या विद्यार्थिनीने केळावण येथील भिवतास धबधब्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. चंद्रकला तुकाराम गायकवाड (१६, रा.खोकरविहीर) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे.

ठळक मुद्देसुरगाण्यातील घटना : आजाराचे कारण

सुरगाणा : तालुक्यातील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा आंबेपाडा (बे.) येथील दहावीच्या विद्यार्थिनीने केळावण येथील भिवतास धबधब्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. चंद्रकला तुकाराम गायकवाड (१६, रा.खोकरविहीर) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. आजारपणाला कंटाळून तिने जीवन संपविल्याची चर्चा आहे. मात्र, मृत्यूचे कारण गुलदस्त्यात आहे.सुरगाणा तालुक्यातील केळावण गावाजवळील भिवतास धबधबा आहे. या धबधब्याच्या कड्यावरून चंद्रकलाने उडी घेतल्याचे बोलले जात आहे. चंद्रकला मंगळवारी (दि.२६) शाळेत जाते असे सांगून गेली होती. मात्र, घराबाहेर पडल्यावर ती शाळेत न जाता थेट भिवतास धबधब्याकडे गेली आणि उडी मारून तिने आत्महत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तिचे चप्पल व कपडे धबधब्याच्या काठावर आढळले आहेत. दरम्यान, संध्याकाळी ६ वाजले तरी ती घरी आली नाही म्हणून तिच्याघरच्यांनी शोधाशोध करायला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी संध्याकाळच्या सुमारास शोध घेण्यासाठी धबधब्याचा परिसर व जंगल पिंजून काढले; परंतु ती कोठेही आढळून आले नाही, मात्र काही व्यक्तींनी एका मुलीचामृतदेह पाण्यावर तरंगत असल्याची माहिती तिच्या नातेवाइकांनादिली. कुटुंबीयांनी तत्काळधबधबा गाठला.मृतदेह त्या धबधब्यातील पाण्यावर तरंगताना आढळून आला, परंतु मृतदेह सहजासहजी काढणे शक्य नव्हते. तहसीलदार विजय सूर्यवंशी यांनी संपर्क करून एका पथकास पाचारण केले, मात्र तोपर्यंत अंधार झाला होता. त्यामुळे शोधकार्य थांबविण्यात आले. शुक्र वारी (दि.२९) सकाळी शोधकार्य पुन्हा सुरू करून मृतदेह बाहेर काढण्यात आला. चांदोरी येथील शोधपथकाचे अध्यक्ष सागर गडाख, बाळू आंबेकर, फकिरा धुळे, विलास गांगुर्डे, सुरेश शेटे, शरद वालघडे यांच्यासह सुरगाणा पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक आर. बी. लोखंडे, पोलीसपाटील विजय चौधरी, नामदेव पाडवी, मनोहर जाधव यांनी शोधमोहीम पार पाडली. ग्रामीण रु ग्णालय बाºहे येथील डॉ. राणी धूम, केदार झिरवाळ यांनी उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला.

टॅग्स :Suicideआत्महत्या