शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

‘सेतू’ला विद्यार्थी, पालकांचा वेढा :दाखल्यांसाठी वणवण

By admin | Updated: June 21, 2017 18:10 IST

महिन्यापूर्वी सर्व कागदपत्रे सादर करूनही दाखले मिळत नसल्याची तक्रार करणाऱ्या विद्यार्थी, पालकांचा धीर सुटत चालला असून, दिवसेंदिवस सेतू केंद्राबाहेरचा विळखा घट्ट होत आहे

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : महिन्यापूर्वी सर्व कागदपत्रे सादर करूनही दाखले मिळत नसल्याची तक्रार करणाऱ्या विद्यार्थी, पालकांचा धीर सुटत चालला असून, दिवसेंदिवस सेतू केंद्राबाहेरचा विळखा घट्ट होत आहे. ठराविक दिवसांच्या मुदतीतच शाळा, महाविद्यालयीन प्रवेशाचे अर्ज कागदपत्रांसह दाखल करण्याचे बंधनकारक असल्यामुळे त्याचा फायदा मध्यस्थ व दलालांनी उठविण्यास सुरुवात केल्याच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत प्रशाासनाने सेतू केंद्र चालकाला दंडाची नोटीस बजावली आहे. शैक्षणिक कारणासाठी जात, वय व अधिवास, राष्ट्रीयत्व, उत्पन्न, नॉन क्रिमीलेअर या शासकीय दाखल्यांची गरज असून, त्यासाठी सेतू वा महा ई सेवा केंद्रात अर्ज करून त्याआधारे देण्याची सोय शासनाने केली आहे. अर्जदाराने अर्ज दाखल केल्यानंतर सात दिवसांत दाखला दिला जावा, असे शासनाचे आदेश असले तरी, प्रत्यक्षात महिना उलटून गेल्यावरही शेकडो नागरिकांना दाखले मिळत नसल्याची वस्तुस्थिती उघड झाली आहे. महा ई सेवा केंद्रचालकांकडून दाखले सेतू केंद्राकडे पाठविले जातात व तेथून ते स्वाक्षरीसाठी प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे दिले जातात. ही सारी प्रक्रिया आॅनलाइन पद्धतीने होत असली तरी, अनेक नागरिकांनी महा ई सेवा केंद्रात दाखल्यासाठी अर्ज करूनही ते सेतूत मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत तर दाखले परिपूर्ण करून प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे पाठवूनही त्यांच्याकडून स्वाक्षरी होऊन येत नसल्याचे सेतू केंद्रचालकांचे म्हणणे आहे. अशातच गेल्या महिन्यापासून ‘महाआॅनलाइन’ या शासनाच्या सॉफ्टवेअर तसेच सर्व्हरमध्ये तांत्रिक दोष निर्माण झाल्यामुळे ही सारी प्रक्रियाच संथगतीने पुढे सरकू लागली आहे. त्याचा परिणाम विद्यार्थी, पालकांवर होत असून, मुदतीत दाखले मिळत नसल्यामुळे त्यांची होणारी तगमग दलाल, मध्यस्थांच्या पथ्थ्यावर पडली आहे. त्यातूनच पैसे घेऊन दाखले दिले जात असल्याच्या त्याचबरोबर शासकीय शुल्कापेक्षा अधिक पैसे घेतल्याच्या तक्रारी असून, वशिलेबाजीचे आरोपही होऊ लागले आहेत. सेतू केंद्रचालकांबाबत होणाऱ्या तक्रारींची दखल घेत जिल्हा प्रशासनाने केंद्रचालकाला ५० हजार रुपये दंडाची नोटीस बजावली आहे. त्याचबरोबर तांत्रिक दोष दूर करण्यासाठी महाआॅनलाइनचे राज्य समन्वयक सुर्वे यांनाही पाचारण करून त्यांच्या कानी सदरची बाब घालण्यात आली आहे. दहावी व बारावीनंतर पुढच्या शैक्षणिक प्रवेशासाठी ठराविक दिवसांची मुदत असून, मुदतीत दाखले न मिळाल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.