शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
2
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
3
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
4
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
5
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
6
प्रेमाच्या आणाभाका; अन् रक्ताची होळी ! पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; रक्ताच्या थेंबांनी उघड झाला कट
7
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
8
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
9
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
10
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
11
छ. संभाजीनगरात भाजपनंतर शिंदेसेनेतही 'निष्ठावंतांचा' आक्रोश; मंत्री शिरसाटांच्या घरासमोर ठिय्या!
12
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
13
केंद्राकडून महाराष्ट्राला गिफ्ट! नववर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय
14
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
15
Video: बॉडीबिल्डर्सनी आधी सफाई कामगाराची उडवली खिल्ली, मग पठ्ठ्याने जे केलं ते पाहून...
16
Viral Video: ई- रिक्षा शोरूमबाहेर नेली अन् पेट्रोल टाकून पेटवून दिली; तरुणानं असं का केलं?
17
IND vs NZ : रिषभ पंतची डाळ शिजणं 'मुश्किल'च; चार संधी मिळाल्या, पण प्रत्येक वेळी अपयशाचा पाढा
18
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
19
NIA प्रमुख सदानंद दाते आता महाराष्ट्राचे नवे पोलिस महासंचालक, ३ जानेवारीला स्वीकारणार पदभार
20
Video: गळफास घेतलेल्या तरुणाला जीवनदान; पोलिस अधिकाऱ्याने CPR देऊन वाचवले प्राण
Daily Top 2Weekly Top 5

शाळेतील विद्यार्थ्यांनी केली पक्ष्यांच्या दाणा-पाण्याची सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 18:55 IST

मानोरी : उन्हाच्या तीव्रतेमुळे चिमणी, कावळे, साळुंकी आदी पक्ष्यांचे पाण्याअभावी खुप हाल होत असून त्यांचा जीव वाचविण्याकरीता जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरात दाणा-पाण्याची सोय केली.

ठळक मुद्देपक्ष्यांच्या दणापाण्याची सोय करून भर उन्हात होणारी पक्ष्यांची भटकंती थांबविली.

मानोरी : उन्हाच्या तीव्रतेमुळे चिमणी, कावळे, साळुंकी आदी पक्ष्यांचे पाण्याअभावी खुप हाल होत असून त्यांचा जीव वाचविण्याकरीता जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरात दाणा-पाण्याची सोय केली.मागील दहा ते पंधरा दिवसापूर्वी मानोरी गावच्या वेशीत तसेच झाडावर, अंगणात दररोज सकाळी नित्यनियमाने पक्ष्यांचा किलबीलाट मोठ्या प्रमाणात ऐकु येत होता. परंतु वातावरण अचानक झालेल्या बदलामुळे येवला तालुक्यात मागील आठ ते दहा दिवसापासून उष्णतेचा पारा चाळीशी पार गेल्याने विविध प्रकारच्या पक्ष्यांचा किलबीलाट कमी झाल्याचे दिसून येत आहे. मानोरीत काही दिवसांपूर्वी सार्वजनिक पाणवठे, पिण्याच्या पाण्याच्या टाकीजवळ साचलेले पाणी, डबके अशा विविध ठिकाणी चिमणी, कावळे, साळुंकी, करकोचे, आदी पक्षी पाणी पिताना दिसून येत होते. एकीकडे पिण्याच्या पाण्याची टंचाई अचानक उष्णता वाढल्याने या पक्ष्यांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.अशातच येवला तालुक्यातील मानोरी बुद्र्ुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक अगरचंद शिंदे आणि शिक्षक राजू सानप यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील जून महिन्यात नवागत विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आलेल्या वृक्षांनाच टाकाऊ वस्तूंपासून बनवलेल्या बाटल्या कापून तसेच नरसाळे आदींना झाडांच्या मध्यभागी बांधून या भटकत्या चिमण्या, कावळे, साळुंक्या आदी पक्ष्यांच्या दणापाण्याची सोय करून भर उन्हात होणारी पक्ष्यांची भटकंती थांबविली.यावेळी समृद्धी मुदगुल, साहिल भवर, ऋग्वेद शेळके, शुभम तिपायले, राहुल तिपायले, अनुष्का भवर, अमित शेळके, कोमल डुकरे, अस्विनी तिपायले, पायल पवार, साहिल खैरनार आदी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.