शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

पिंप्री सदो आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा उपायुक्तांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 18:33 IST

सुविधांचा अभाव : सहा कि.मी. पायपीट करून घेतली भेट

ठळक मुद्देकाही महिन्यांपासून या मुलांना निकृष्ट दर्जाचा आहार दिला जात आहे. तसेच इयत्ता दहावीची परीक्षा जवळ आलेली असतांना देखील काही विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध नाहीत

घोटी : आदिवासी विभागाच्या पिंप्री सदो ता. इगतपुरी येथील निवासी आश्रमशाळेतील शेकडो विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या आहारात असलेली आणि इतर मूलभूत सुविधा मिळत नसल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी सहा कि.मी. पायपीट करत आदिवासी विकास विभागाचे उपआयुक्त लाभेश सलामे यांना घेराव घालून आपली कैफीयत मांडली.इगतपुरी तालुक्यातील पिंप्री सदो येथे सुसज्ज अशी निवासी नवीन आश्रमशाळा सुरू करण्यात आली आहे. या शाळेत दोनशेपेक्षा जास्त विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षण घेतात. मात्र काही महिन्यांपासून या मुलांना निकृष्ट दर्जाचा आहार दिला जात आहे. तसेच इयत्ता दहावीची परीक्षा जवळ आलेली असतांना देखील काही विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध नाहीत. यासह शासनाच्या विविध सुविधा मिळत नसल्याने विद्यार्थी त्रस्त झाले होते. विद्यार्थ्यांनी शाळेचे अधीक्षक आणि प्राचार्यांकडे अनेकदा तक्र ारी केल्या. मात्र त्यांनी  दखल न घेता उलट दाखला देऊन घरी पाठविण्याचा दम देण्यात आला होता. यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी मागील आठवड्यात आदिवासी विभागाच्या आयुक्तांची भेट घेऊन कैफियत मांडण्यासाठी सहा किलोमीटर अंतर पायपीट करून महामार्ग गाठला होता. त्यावेळी इगतपुरीचे पोलीस निरीक्षक राजेश शिंगटे यांनी मध्यस्थी करीत विद्यार्थ्यांची समजूत घालून पुन्हा शाळेत पाठविले होते.मात्र आठवडा उलटूनही कोणतीच सुधारणा न झाल्याने या विद्यार्थ्यांनी शुक्रवारी (दि.४) पुन्हा आक्र मक होत आयुक्तांच्या भेटीला जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार हे शेकडो विद्यार्थी सकाळीच पुन्हा सहा किलोमीटर अंतर पायपीट करीत पिंप्री सदो फाट्यावरील विश्रामगृहावर पोहचले. या बाबीची पोलिसांना कुणकुण लागल्यावर इगतपुरीचे पोलीस निरीक्षक राजेश शिंगटे यांनी धाव घेऊन विद्यार्थ्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र विद्यार्थी ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने अखेर पोलिसांनी आदिवासी विभागाच्या उपायुक्तांना फोनवरून कळविले. उपायुक्त लाभेश सलामे यांच्यासह सुनील जगताप, व कार्यालयीन अधीक्षक युवराज गोरे यांनी आंदोलनस्थळी भेट दिली.आश्वासनानंतर आंदोलन मागेसंतप्त विद्यार्थ्यांनी उपायुक्तांना घेराव घालून आपल्या व्यथा मांडल्या. यावेळी उपायुक्तांनी विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेत लवकरच शाळेला सर्व सुविधा पुरवण्याचे मान्य करीत शाळेत स्वत: भेट देऊन चौकशी करण्याची ग्वाही दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

टॅग्स :NashikनाशिकSchoolशाळा