शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकाकडून विद्यार्थिनींचा विनयभंग नाशिक केंब्रिज स्कूलमधील प्रकार : पालकांकडून बेदम चोप : पोलिसांत गुन्हा दाखल

By admin | Updated: June 28, 2014 01:49 IST

इंदिरानगर : विद्यार्थिनींसोबत अश्लील चाळे व भाषा वापरणाऱ्या नाशिक केंब्रिज स्कूलच्या एका शिक्षकाला पालक व मनविसेच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी चांगला चोप दिला़

इंदिरानगर : विद्यार्थिनींसोबत अश्लील चाळे व भाषा वापरणाऱ्या नाशिक केंब्रिज स्कूलच्या एका शिक्षकाला पालक व मनविसेच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी चांगला चोप दिला़ या शिक्षकावरील कारवाईसाठी शाळेच्या मुख्याध्यापक व संचालकांना घेरावही घालण्यात आला़ दरम्यान, या प्रकरणी पालकांनी दिलेल्या फि र्यादीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात शिक्षकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यास अटक करण्यात आली आहे़ याबाबत अधिक माहिती अशी की, वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील सार्थकनगरमध्ये नाशिक केंब्रिज स्कूल आहे़ या शाळेतील सॅम्पो लामा (मूळ राहणार दार्जिलिंग) हा शिक्षक इयत्ता सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांना शिकविण्याचे काम करतो़ सॅम्पो लामा हा शिक्षक गेल्या वीस दिवसांपासून शिकवत असताना, विद्यार्थिनींशी अश्लील चाळे व भाषेचा वापर करीत होता़ त्यामुळे त्यांच्या तासास बसण्यास बहुतेक विद्यार्थिनी घाबरून शेवटच्या बाकावर बसत होत्या़ मात्र तरीही लामा या विद्यार्थिनींच्या जवळ बसून अंगलट करीत असे़ यातील काही विद्यार्थिनींनी हा प्रकार पालकांना सांगितला़ या प्रकारामुळे संतप्त झालेल्या पालकांनी गुरुवारी (दि़ २६) शाळेत जाऊन सॅम्पो लामा यास जाब विचारून चांगला चोप दिला व कारवाईची मागणी केली़ यावेळी मुख्याध्यापक सी़ सोनू यांनी पालकांना उडवाउडवीची उत्तरे दिली़ या प्रकाराने अधिक संतप्त झालेल्या पालकांनी शुक्रवारी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना घेऊन मुख्याध्यापकांनी सॅम्पो लामावर कारवाई करावी यासाठी सुमारे दोन तास आंदोलन केले़; मात्र यावेळी उडवाउडवीची उत्तरे देण्यात आल्याने संस्थाचालक व ट्रस्टी येईपर्यंत शाळेतून न जाण्याचा निर्णय पालकांनी घेतला़ या प्रकारानंतर संस्थाचालक भारती हे शाळेत आले. त्यांनी गुरुवारीच शिक्षक लामा यास शाळेतून काढून टाकल्याची माहिती दिली़ या आंदोलनात नगरसेवक सुजाता डेरे, अर्चना जाधव, सतीश सोनवणे, मनविसेचे पदाधिकारी अजिंक्य गिते, संजय जाधव, आकाश खोडे, आरती तिवारी, सोनाली लोहार, वैशाली सोनी यांसह पालकवर्गाने सहभाग घेतला़ यांनतर विद्यार्थिनींचे पालक व मनविसेच्या पदाधिकाऱ्यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात शिक्षक सॅम्पो लामा याच्याविरुद्ध फि र्याद दिली असून, पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे़