शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना शाळेतूनच मिळणार पाठ्यपुस्तके मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप : सर्व शिक्षा अभियानांतर्गत पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकाचे होणार वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 01:04 IST

नाशिक : विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके हातात न देता पाठ्यपुस्तकांची रक्कम त्यांच्या बॅँक खात्यात जमा करण्याचा शालेय शिक्षण विभागाचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपाने मागे घेण्यात आला.

ठळक मुद्देपुस्तके विकत घेण्याचे आदेश पालकांची परवड थांबणार

नाशिक : विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके हातात न देता पाठ्यपुस्तकांची रक्कम त्यांच्या बॅँक खात्यात जमा करण्याचा शालेय शिक्षण विभागाचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपाने मागे घेण्यात आला असून, आता विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच शाळेतून पाठ्यपुस्तके मिळणार आहेत.शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना देण्यात येणारी पाठ्यपुस्तके शाळेतून न देता तेवढी रक्कम विद्यार्थ्यांच्या बॅँक खात्यात जमा करण्याचे आणि विद्यार्थ्यांनी त्या पैशातून पुस्तके विकत घेण्याचे आदेश काढले होते. या आदेशासंदर्भात शिक्षण विभाग तसेच मुख्यमंत्र्यांकडे देखील तक्रारी करण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांच्या बॅँक खात्यात पैसे दिल्यास शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थी पुस्तके विकत घेऊन शाळेत येतील याची शाश्वती नसल्याने आणि त्यातून विद्यार्थ्यांपर्यंत पाठ्यपुस्तके मिळतीलच याची शाश्वती नसल्याने अखेर मुख्यमंत्र्यांनी या निर्णयात हस्तक्षेप करीत पुढीलवर्षी विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच मोफत पाठ्यपुस्तके शाळेतूनच मिळतील असे आदेश काढले आहेत. सदर आदेश जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या शिक्षण विभागालादेखील प्राप्त झाले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयामुळे पालकांची परवड थांबणार आहे. बॅँक खाते उघडण्यासाठी पालकांची चांगलीच धावपळ झाली होती. शिवाय पाठ्यपुस्तके खरेदीमुळे सर्वच विद्यार्ती पाठ्यपुस्तके खरेदी करतीलच याची शाश्वती नव्हती. शिवाय पहिल्याच दिवशी शाळेतून मिळणाºया पुस्तकांचा आनंद वेगळाच असल्याने विद्यार्थ्यांना आता हा आनंद मिळणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे स्वागत.- नंदलाल धांडे, अध्यक्ष, खासगी शिक्षक-शिक्षकेतर महासंघ