नाशिक: राज्यातील विविध विद्यापीठांच्या पदवी अभ्यासक्रमांच्या अंतीम वर्ष परीक्षांवरून राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकारच्या राजकारणात विद्यार्थ्याचा बळी जात आहे. केंद्र सरकार विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युजीसी) माध्यमातून राज्यातील विद्यापीठे व राज्य सरकारवर परीक्षा घेण्यासाठी दबाव आणत असल्याचा आरोप सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्राध्यपक महासंघाने केला आहे.राज्यात अंतीम वर्ष परीक्षांवरून राजकारण तापलेले असताना युजीसीने देशभरातील विविध विद्यापीठांना अंतीम वर्षाच्या परीक्षा घेण्याच्या सुचना केल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी व प्राध्यापक संघटनांनी आक्रमक धोरण स्विकारीत घेत युजीसीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. देशभरातील वेगवेगळ््या राज्यांतील परिस्थिती भिन्न आहे, महाराष्ट्रात रोज कोरोनाचे रुग्ण वाढत असताना परीक्षांचे नियोजन करण संयुक्तिक नसल्याचे राज्य सरकाने केंद्र सरकारच्या लक्षात आणून दिलेले असतानाही युजीसीच्या माध्यमातून परीक्षा घेण्याविषयी दबाव आणण्याचा प्रयत्न होत असून त्यामुळे विद्यार्थ्यांसह शिक्षक व शिक्षकांचेही आरोग्य धोक्यात आणण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप विद्यार्थी संघटना व प्राध्यापक महासंघाने केला आहे. दरम्यान, राज्य व केंद्राच्या राजकारणात विद्यापीठाची कोंडी झाली आहे.
अंतीम परीक्षांच्या राजकारणात विद्यार्थ्यांचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 18:07 IST
नाशिक : राज्यातील विविध विद्यापीठांच्या पदवी अभ्यासक्रमांच्या अंतीम वर्ष परीक्षांवरून राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकारच्या राजकारणात विद्यार्थ्याचा बळी जात ...
अंतीम परीक्षांच्या राजकारणात विद्यार्थ्यांचा बळी
ठळक मुद्देराज्य विरोधात केंद्राची भूमिका युजीसीच्या माध्यमातून दबाव