शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

चिंचला आश्रमशाळेतील विद्यार्थी राज्य पातळीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 00:24 IST

कोकमठाण येथे आयोजित विभागीय क्रीडा स्पर्धेत तालुक्यातील चिंचला येथील आश्रमशाळेतील सोळा खेळाडूंची राज्य पातळीवर निवड झाली.

सुरगाणा : कोकमठाण येथे आयोजित विभागीय क्रीडा स्पर्धेत तालुक्यातील चिंचला येथील आश्रमशाळेतील सोळा खेळाडूंची राज्य पातळीवर निवड झाली.कोकमठाण येथील इंटरनॅशनल स्कूलमध्ये सांघिक व मैदानी स्पर्धा नुकत्याच पार पडली. यामध्ये कळवण प्रकल्पाचे नेतृत्व करताना १७ वर्षातील मुलांच्या गटात कबड्डी प्रकारात धुळे प्रकल्पाचा पराभव केला. रिलेमध्ये १७ वर्ष आतील मुलींचा प्रकारात यावल, खो-खोमध्ये १७ वर्ष आतील मुलींचा नंदुरबार प्रकल्पाचा पराभव करत राज्य पातळी गाठली. योगेश कनोजे, मनोज वाघमारे, सचिन कामडी, सचिन पाडवी, संजय चौधरी, गणेश गवळी, योगेश गवळी, किरण भोये, पांडुरंग पवार, कांतिलाल गावित, जयश्री जाधव, अश्विनी कुवर, पूजा महाले, दीपाली गावित, ज्योती वाघमारे, रेणुका गावित, रिंकू चव्हाण या खेळाडूंची राज्य पातळीवर निवड झाली. राज्यस्तरिय क्रीडा स्पर्धा अमरावती येथे होणार आहेत. संघाला क्रीडाशिक्षक दिलीप खांडवी,गंगाराम गावित, योगेश गावित, रामदास गवळी, दिनकर महाले, वर्षा तांबे, सर्व शिक्षक - शिक्षकेतर वर्गाचे मार्गदर्शन मिळाले.

टॅग्स :Educationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्र