नाशिक : कोरोनापासून सुरक्षिततेकरिता लॉकडाऊनच्या काळात बीवायके कॉलेज आॅफ कॉमर्स राष्ट्रीय सेवा योजना व प्लेज फॉर लाइफ यांच्या संयुक्त विद्यमाने थुंकीमुक्त शहर अभियान ही जनजागृती मोहीम राबविण्यात आली. कारण सध्या बंदी असूनदेखील तंबाखू व गुटखा खाऊन सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर थुंकण्याचे प्रमाण वाढले आहे.कोरोना या महामारीचा संसर्ग वाढत असून, सरकारने सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यावर बंदी घातली आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यामुळे काय दुष्परिणाम होतात, हा संदेश या अभियानातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी लोकांपर्यंत पोहोचवला. या अभियानात एक लिंक जास्तीत जास्त जणांना शेअर केली. या अभियानात कार्यक्र म अधिकारी डॉ. एच. पी. वंगरवार , टोबॅको कंट्रोल लिडर गंधार सरदेशपांडे असून, सोशल मीडिया लिडर ऋ षिकेश देशपांडे हे आहेत.दरम्यान, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे दरवर्षी स्वच्छवारी, निर्मलवारी, स्वस्थवारी आणि हरितवारीअंतर्गत स्वयंसेवकांनी जेथे आपण राहत आहोत तेथेच किंवा आजूबाजूच्या परिसरात उपक्रम राबविण्याचे ठरविले. बी. वाय. के. कॉलेज आॅफ कॉमर्समध्ये काही वृक्ष संगोपन व पर्यावरण जनजागृती मोहीम राबविण्यात आली. तसेच स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी, प्रा. डॉ. एच. पी. वंगरवार, प्रा. संगीता मोरे, प्रा. डॉ. योगिनी दीक्षित, प्रा. डॉ. शिशीर सिंदेकर, प्रा. पंकज बावणे आदी उपस्थित होते. तसेच काही विद्यार्थ्यांनी सुद्धा या वारीमध्ये सहभागी होऊन आपल्या राहत्या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविली आणि समाजात जनजागृती निर्माण केली.-----------------जनजागृतीचे कार्यया अभियानातून लोकांपर्यंत लिंकच्या मार्फत संदेश पोहोचवून समाजात एक वेगळ्या प्रकारची जनजागृती निर्माण केली. या अभियानातून आत्तापर्यंत हजारो लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याचे काम केले आहे. तरी अजून जास्तीत जास्त लोकांनी या अभियानात सहभागी व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
विद्यार्थ्यांनी राबविले थुंकीमुक्त अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 02:17 IST