शहरं
Join us  
Trending Stories
1
Municipal Corporation Election: विदर्भात महायुतीचे ठरले! चार महापालिकांत शिंदेसेना, तर दोन ठिकाणी अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत
2
२७ महापालिकांत कुणाचे किती नगरसेवक? गेल्यावेळी भाजपचे...; ४३९ जागा जिंकून काँग्रेस होती तिसऱ्या क्रमांकावर
3
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
4
‘माझा मुलगा वर्षावर मला भेटायला टॅक्सीने यायचा’; पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळातील किस्सा सांगितला
5
नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ६ विश्वासार्ह गुंतवणूक योजना; तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासू देणार नाहीत
6
बांगलादेशात खळबळ! १७ वर्षांनंतर तारिक रहमान मायदेशी परतले; येताच मोहम्मद युनूस यांना केला फोन!
7
संपादकीय: पुन्हा चुकू अन् फुटू नका, राज-उद्धव आणि भाजप...
8
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
9
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
11
पीछेहाट कम्युनिस्ट पक्षाची, विचारसरणीची नव्हे!
12
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
13
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
14
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
15
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
16
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
17
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
18
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
19
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
20
डिलिव्हरी बॉयची कमाई किती? पाच वर्षांत कमविले दीड कोटी...
Daily Top 2Weekly Top 5

आधार कार्डकरिता विद्यार्थ्यांची तारांबळ

By admin | Updated: July 19, 2015 00:14 IST

पहिली ते आठवीच्या प्रत्येक विद्यार्थ्याला आधारकार्ड काढणे बंधनकारक असल्याचा अध्यादेश शासनाने काढलेला आहे.

नाशिक - जगभरातील तरुणाईला चॅटिंगचे वेड लावणाऱ्या ‘व्हॉट्स अ‍ॅप’ने आता साधू-महंतांनाही भुरळ घातली आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त नाशिकमध्ये दाखल झालेले साधू-महंत परस्परांशी संवाद साधण्यासाठी चक्क ‘व्हॉट्स अ‍ॅप’ या मेसेंजर सेवेचा वापर करत आहेत. विविध ग्रुपच्या माध्यमातून ही मंडळी फावल्या वेळेत व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर चॅटिंग करीत संदेशांची देवाण-घेवाण करतात. अर्थात हे सर्व संदेश धार्मिक असल्याने या ग्रुपमध्ये मोठ्या प्रमाणात शिष्यांचा गोतावळादेखील आहे. बहुतांश साधू-महंत आपला शिष्य संप्रदाय निर्माण करण्यासाठी फेसबुकचाही वापर करत आहेत. या माध्यमातून त्यांनी देश-परदेशांत आपल्या शिष्यांचा मोठा गोतावळा निर्माण केलेला दिसून येतो. तर बरेच साधू ट्विटरवरदेखील अ‍ॅक्टिव्ह आहेत. रोजच्या ट्विट्सच्या माध्यमातून ते आपल्या शिष्यांना उपदेश करतात. ई-संवादाची ही आधुनिक माध्यमे सध्या सर्वच आखाड्यांमध्ये विशेष लोकप्रिय झाली आहेत. भारतातच नव्हे, तर जगभरातील शिष्यांसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधणाऱ्या साधू-महंतांमध्ये अ‍ॅड्राईड मोबाइलचे कमालीचे आकर्षण वाढत आहे. त्यामुळे बहुतांश साधूंच्या झोळीत चंदन, अष्टगंध, बुक्का, हळदी-कुंक या पूजेच्या साहित्यांबरोबरच अ‍ॅड्राईड मोबाइल हमखास बघावयास मिळतो. व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुकवर जगभरातील शिष्यांनी पाठविलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे न विसरता साधू-महंतांकडून दिली जातात. याबाबत बोलताना महंत रामसनेहीदास यांनी सांगितले की, व्हॉट्स अ‍ॅप किंवा फेसबुकचा वापर करण्यात काहीच गैर नाही. सध्या आधुनिक माध्यमांनी क्रांती घडवून आणली आहे; त्याकडे आपल्याला दुर्लक्ष करता येणार नाही. या माध्यमांमुळे आपला वेळ तर वाचतोच, तसेच नव्या तंत्रज्ञानाचा वापर केल्याचा एक वेगळा आनंदही मिळतो. महंतांचा व्हॉट्स अ‍ॅपवरही वादकधी मानापमान तर कधी जागेच्या मुद्द्यांवर नेहमीच खटके उडत असलेल्या महंतांचे व्हॉट्स अ‍ॅपवर असलेल्या ‘महंत’ या ग्रुपमध्येदेखील वाद होत असल्याचे एका महंताने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. दर दिवसाला वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या या ग्रुपवर शेअर केल्या जातात. त्यामुळे त्यावर लगेचच प्रतिक्रिया दिल्या जात असून, त्यातून बऱ्याचदा वाद निर्माण होतो. या ग्रुपमध्ये जवळपास सर्वच आखाड्यांचे महंत असल्याने कधी कधी वाद जास्तच विकोपाला जात असल्याचेही सांगितले.