शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या भाषणाची सक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 01:35 IST

नाशिकरोड येथील पुरुषोत्तम विद्यालयात शुक्रवारी (दि. १६) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात आले. परंतु, दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची सध्या परीक्षा असल्याने त्यांनी या कार्यक्रमाला दांडी मारली. त्यामुळे कार्यक्रमाला उपस्थिती दिसावी म्हणून शिक्षकांनी सक्तीने बसवलेल्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात गोंगाट केल्याने त्यांना शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कान पिळणे, पाठीवर, तोंडावर चापटीने मारण्यापासून छडीने मारण्यापर्यंतची शिक्षा दिली.

ठळक मुद्देपंतप्रधानांचे भाषण अतिशय प्रेरणादायी तोंडावर चापटीने मारण्यापासून छडीने मारण्यापर्यंतची शिक्षा

नाशिक : नाशिकरोड येथील पुरुषोत्तम विद्यालयात शुक्रवारी (दि. १६) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात आले. परंतु, दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची सध्या परीक्षा असल्याने त्यांनी या कार्यक्रमाला दांडी मारली. त्यामुळे कार्यक्रमाला उपस्थिती दिसावी म्हणून शिक्षकांनी सक्तीने बसवलेल्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात गोंगाट केल्याने त्यांना शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कान पिळणे, पाठीवर, तोंडावर चापटीने मारण्यापासून छडीने मारण्यापर्यंतची शिक्षा दिली.  पंतप्रधानांचे भाषण व विद्यार्थ्यांशी संवाद विद्यार्थ्यांनी थेट पुरुषोत्तम विद्यालयात ऐकावा यासाठी ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात आले. मात्र, पंतप्रधानांच्या प्रश्नोत्तराचा कार्यक्रम हिंदी आणि इंग्रजीतून असल्याने आणि तो अधिक लांबल्याने विद्यार्थ्यांनी सभागृहात गोंगाट केला. त्यामुळे संतप्त शिक्षकांनी छडीचा वापर करून विद्यार्थ्यांना शिक्षा केली. त्याचप्रमाणे काही शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे कान पिळून, तर काहींनी पाठीत व तोंडात चापटी मारून विद्यार्थ्यांना शिक्षा केली. विषेश म्हणजे, हा प्रकार सुरू असताना शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव हेही सभागृहात उपस्थित राहून पंतप्रधानांचा कार्यक्रम पाहत होते. परंतु, त्यांच्या उपस्थितीतही काही शिक्षकांनी विद्यार्थ्यांना अशाप्रकारे शिक्षा केली. त्यामुळे शिक्षण उपसंचालकांनी एमराल्ड स्कूलमधील प्रकरणानंतर विद्यार्थ्यांना शिक्षा न करण्यासंबंधी काढलेल्या आदेशाला पुरुषोत्तम विद्यालयाच्या शिक्षकांनी केराची टोपली दाखवली असल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे.  दरम्यान, या गोंधळातही काही विद्यार्थ्यांनी मात्र लक्षपूर्वक पंतप्रधानांचा कार्यक्रम पाहिला आणि या कार्यक्रमातून आम्हाला तणावमुक्त राहून परीक्षा देण्याची प्रेरणा मिळाल्याचे सांगितले.पंतप्रधानांचे भाषण अतिशय प्रेरणादायी होते. त्यांनी सचिन तेंडुलकरचे उदाहरण देऊन समोर आलेल्या परीक्षेला कसे एकाग्र चित्ताने सामोरे जावे हे समजावून सांगितले. त्यामुळे परीक्षेची भीतीच मनातून नाहीसी झाली आहे.  - निशांत क्षीरसागर, नववीतील विद्यार्थीपंतप्रधानांनी तणावमुक्त परीक्षा कशी द्यावी याविषयी मार्गदर्शन केले. त्यानी मन शांत करण्यासाठी योगासन करण्याचा सल्ला दिला. योगासनाच्या ज्या आसनात आपल्याला चांगले वाटते त्या आसनाचा नियमित अभ्यास केला तरी तणाव दूर होत असेल तर नक्कीच परीक्षेचे टेन्शन दूर करण्यासाठी योगासने करणे मजेशीर ठरतील.  - तेजस पाटील, आठवीतील विद्यार्थी

 

टॅग्स :Schoolशाळाprime ministerपंतप्रधान