शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना आॅल द बेस्ट; बारावी परीक्षा आजपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 00:15 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) लेखी परीक्षेला मंगळवार (दि. १८) पासून सुरुवात होत असून, शिक्षण विभागाच्या कॉपीमुक्त परीक्षा अभियानासाठी जिल्हानिहाय सात पथकांची स्थापना करण्यात आली आहे. संभाव्य गैरप्रकार टाळण्यासाठी या भरारी पथकांची परीक्षेवर करडी नजर राहणार आहे.

नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) लेखी परीक्षेला मंगळवार (दि. १८) पासून सुरुवात होत असून, शिक्षण विभागाच्या कॉपीमुक्त परीक्षा अभियानासाठी जिल्हानिहाय सात पथकांची स्थापना करण्यात आली आहे. संभाव्य गैरप्रकार टाळण्यासाठी या भरारी पथकांची परीक्षेवर करडी नजर राहणार आहे.विद्यार्थ्यांच्या करिअरचा महत्त्वाचा टप्पा म्हणून पाहिल्या जाणाºया बारावीच्या परीक्षेची विभागीय शिक्षण मंडळाकडून तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती शिक्षण मंडळाकडून देण्यात आली असून, सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत इंग्रजीचा पहिला पेपर होणार आहे. त्यासाठी नाशिक जिलह्यातून ७५ हजार ३४३ विद्यार्थ्यांसह विभागातून १ लाख ६६ हजार ७१८ विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. या परीक्षेतील यशावर पुढील भवितव्य अवलंबून असल्याने विद्यार्थ्यांनी परीक्षेची जोरदार तयारी केली आहे. नाशिक विभागातून बारावीच्या परीक्षेला यंदा १ लाख ६६ हजार ४६८ विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. यात कला शाखेच्या ६६ हजार ७१८, वाणिज्य शाखेच्या २३ हजार ८७४ आणि विज्ञान शाखेच्या ६९ हजार ३३७ तर एमसीव्हीएसीच्या ६ हजार ५४९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. नाशिक विभागातून नाशिक जिल्ह्णातील ७५ हजार ३४३ विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. विविध विषयांच्या प्रात्यक्षिक, तोंडी व श्रेणी परीक्षा यापूर्वीच पार पडल्या असून, १८ फेबु्रवारीपासून सुरू होणारी लेखी परीक्षा १८ मार्चला संपणार आहे. कॉपी व तणावमुक्त परीक्षेसाठी मंडळाकडून प्रयत्न सुरू आहेत. परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना आठवड्यातून एक दिवस मुख्याध्यापकांना मार्गदर्शन करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यामुळे यंदाची परीक्षा तणावमुक्त होणार असल्याचा दावा शिक्षण मंडळाकडून करण्यात आला आहे. दरम्यान, मागील वर्षी नाशिक विभागात जळगाव जिल्ह्णात कॉपीची सर्वाधिक प्रकरणे उघडकीस आली होती. त्यामुळे यंदा या जिल्ह्णात लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. कॉपीमुक्त परीक्षेसाठी संबंधित केंद्र संचालकाची विशेष कार्यशाळा घेऊन मार्गदर्शन तसेच सूचनापुस्तिकेचे वाटप करण्यात आल्याचे शिक्षण मंडळाकडून सांगण्यात येत आहे. तसेच यंदा भरारी पथकांची संख्यादेखील वाढविण्यात आली आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रEducationशिक्षण