शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

दहावीच्या निकालापूर्वीच विद्यार्थ्याची आत्महत्या

By admin | Updated: June 13, 2017 00:50 IST

सिडकोतील घटना : नापास होण्याची भीती

 लोकमत न्यूज नेटवर्कसिडको : सोशल मीडियावर सुरू असलेल्या दहावीच्या निकालाच्या तारखेमुळे परीक्षेतील निकालाच्या धास्तीपोटी पाटीलनगर येथील दहावीच्या विद्यार्थ्याने निकालाच्या एक दिवस आधीच राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्त्या केल्याची घटना सोमवारी (दि़१२) सकाळी उघडकीस आली़ कौस्तुभ कालिदास मुंगेकर (१५, रा़ कालिका पार्क, पाटीलनगर, सिडको) असे आत्महत्त्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे़अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गत २० वर्षांपासून कालिदास मुंगेकर हे पाटीलनगरमध्ये राहतात़ त्यांचा एकुलता एक मुलगा कौस्तुभ हा तिडके कॉलनीतील सेंट फ्रान्सिस शाळेत शिक्षण घेत असून त्याने यावर्षीय दहावीची परीक्षा दिली होती़ गत काही दिवसांपासून सोशल मीडीयावर दहावीच्या निकालाच्या वेगवेगळ्या तारखा दिल्या जात होत्या़ त्यातच रविवारी दिवसभर सोमवारी दहावीचा निकाल असे संदेश फिरत परसल्याने परीक्षेत नापास होण्याची भीती कौस्तुभला होती़ कौस्तुभ हा रविवारी (दि.११) रात्री उशिरापर्यंत आई-वडीलांसोबत गप्पा मारीत होता़ यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास कौस्तुभने घरातील हॉलमध्ये ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. वडील कालिदास पहाटे चार वाजेच्या सुमारास उठले असता त्यांना कौस्तुभने आत्महत्या केल्याचे दिसले़ याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे़ कौस्तुभच्या पश्चात आई, वडील असा परिवार असून या घटनेमुळे पाटीलनगर परिसरात शोककळा पसरली आहे़आता मला कोण आई म्हणेल...कौस्तुभ हा कालिदास मुंगेकर यांचा एकु लता एक मुलगा़ आई-वडीलांनी लहानपणापासूनच त्याचे सर्वच लाड पुरविले़ मात्र, त्याने अचानक आत्महत्त्येचे पाऊन उचलल्याने त्यांना जबर मानसिक धक्का बसला आहे़ ‘मला, आता आई कोण म्हणेल’ या आठवणीत दिवसभर कौस्तुभची आई रडत होती़विद्यार्थ्यांनी निराश होऊ नयेनापास होणाऱ्या विद्यार्थ्यांनी निराश होऊन चुकीची पावले उचलू नयेत़ नापास विद्यार्थ्यांसाठी लगेचच जुलै महिन्यात पुरवणी परीक्षा होते व यामध्ये पास होणाऱ्या विद्यार्थ्यांचे वर्षही वाया जात नाही. तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून निकालाची तारीख एक दिवस आधी कळविली जाते. त्यामुळे सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नये.- रामचंद्र जाधव, उपसंचालक, नाशिक शिक्षण विभाग, नाशिक