शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणप्रेमी युवकांच्या मदतीने सुरू केले विद्यार्थी वाचनालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 16:00 IST

वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील आदिवासी भाग असलेल्या गांडोळे येथे गावातील शिक्षणप्रेमी युवकांच्या मदतीने शिक्षकांनी विद्यार्थी वाचनालय सुरू केले आहे.

ठळक मुद्देएका वेळेस केवळ १२ ते १५ विद्यार्थ्यांना एक तासासाठी प्रवेश देण्यात येतो.

वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील आदिवासी भाग असलेल्या गांडोळे येथे गावातील शिक्षणप्रेमी युवकांच्या मदतीने शिक्षकांनी विद्यार्थी वाचनालय सुरू केले आहे.कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. शासनाने यावर उपाय म्हणून आॅनलाईन शिक्षण सुरू केले. व्हाट्स अ‍ॅप, गुगल मिट, झुमद्वारे शिक्षणाचे धडे गिरवले जातात. मात्र दिंडोरी तालुक्याचा पश्चिम भाग हा अतिशय दुर्गम व आदिवासी लोकवस्तीचा आहे. येथे मोबाईल टॉवर नसल्याने इंटरनेट सेवा पुरेशी नाही. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे जिल्हा परिषद गांडोळे शाळेच्या शिक्षकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी गावातील शिक्षण प्रेमी युवकांशी संवाद साधत विद्यार्थी वाचनालय सुरू करण्याचा मानस व्यक्त केला. त्यास ग्रामस्थांनी सकारात्मक प्रतिसाद देत शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष धनराज भोये यांच्या सहकार्याने मोहन जाधव या युवक, पालकाने आपल्या घराची एक खोली विद्यार्थी वाचनालयासाठी उपलब्ध करून दिली. येथे शाळेतील अभ्यासक्र मासह छान छान गोष्टी, महापुरु षांची छोटी चित्रे, शैक्षणिक मासिके व पालकांनी भेट दिलेली शालोपयोगी पुस्तके ठेवण्यात आली आहेत. तसेच आकाशवाणी संचाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येते. शिक्षकांनी वर्गनिहाय वेळापत्रक तयार केले असून एका वेळेस केवळ १२ ते १५ विद्यार्थ्यांना एक तासासाठी प्रवेश देण्यात येतो. मार्गदर्शनासाठी शिक्षक वाचनालयात उपस्थित राहतात.कोट...दिंडोरी पंचायत समितीच्या मार्गर्शनाने जिल्हा परिषद गांडोळे शाळेने कोरोनाच्या पार्श्वभुमीवर शाळा बंद शिक्षण सुरू अंतर्गत नियमांचे पालन करून विद्यार्थी वाचनालय सुरू केले आहे . विदयार्थीभिमुख शिक्षणाला चालना दिली आहे.-भास्कर कनोज,अध्यक्ष,गट शिक्षणाधिकारी.कोरोना मुळे मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत होते. ती अडचण आमच्या गावात शिक्षकांनी विदयार्थी वाचनालय सुरू करून दुर केली.आमच्या आदिवासी भागात लाईट व मोबाईलची सेवा नियमीत नसल्याने वाचनालय आमच्यासाठी वरदान ठरले आहे.-धनराज भोये, शालेय व्यवस्थान समिती.

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाStudentविद्यार्थी