शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
2
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
5
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
6
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
7
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
8
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
9
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
10
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
11
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
12
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
13
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
14
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
15
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
16
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
17
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
18
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
19
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
20
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश

मालेगावी बसच्या धडकेत विद्यार्थी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 23:32 IST

मालेगाव मध्य : मुंबई-आग्रा महामार्गावरील सायने बु।। शिवारात एसटी बसने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक विद्यार्थी ठार झाला आहे तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

ठळक मुद्देनातलगांचा बसस्थानक आवारात ठिय्या

मालेगाव मध्य : मुंबई-आग्रा महामार्गावरील सायने बु।। शिवारात एसटी बसने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक विद्यार्थी ठार झाला आहे तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे.याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी बसचालक विकास राजेंद्र माळी, रा. शिरपूर याला अटक केली आहे.शनिवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. धुळेकडून मालेगावकडे येणाऱ्या शिरपूर-पुणे बसने (क्र. एमएच २० बीएल ३४४९) रस्ता ओलांडणाºया दुचाकीला (क्र. एमएच १५ सीएक्स ६७०२) धडक दिली. या अपघातात धीरज रघुनाथ चव्हाण (२५) रा. वसई, हल्ली मुक्काम मालेगाव हा जागीच ठार झाला, तर दुचाकीवर मागे बसलेला शंतनू भिका माळी (२६), रा. सिन्नर हा गंभीर जखमी झाला. धीरज हा औषधनिर्माण शास्त्र अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षात शिकत होता. अपघातानंतर दुचाकीने पेट घेतला होता. महामार्ग पोलिसांनी अग्निशमन यंत्राद्वारे घटनास्थळी धाव घेऊन दुचाकीला लागलेली आग विझवली.दरम्यान मृताचे नातलग अपघातग्रस्त बसचालकाची माहिती घेण्यासाठी बसस्थानकात गेले असता अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने नातलग व मित्र परिवाराने स्थानक आवारात ठिय्या आंदोलन केले. यामुळे आवारात वाहतूक ठप्प झाली होती. या आंदोलनाची माहिती आयेशानगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक खगेंद्र ठेंबेकर, सहायक पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांना मिळताच त्यांनी कर्मचाºयांसह आंदोलनस्थळी धाव घेतली. आंदोलक वबसस्थानक प्रशासनांमध्ये मध्यस्थी केल्याने आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले. अपघातातील मृत धीरजचे वडील रघुनाथ चव्हाण राज्य परिवहन विभागात वाहक पदावर कार्यरत आहेत. घटना घडली तेव्हा रघुनाथ हे शहादा-वसई बस मालेगावकडे येत होते. येताना त्यांनी अपघात पाहिला. बसस्थानकात गाडी पोहोचताच त्यांच्या भ्रमणध्वनीवर मुलाचा अपघातात मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. यावेळी त्यांनी एकच हंबरडा फोडला. काळीज पिळवटून टाकणारी बातमी कर्तव्य बजावत असतानाच मिळाल्याने बसस्थानकातील वाहक व चालकांना गहिवरुन आले होते.

 

टॅग्स :AccidentअपघातMalegaonमालेगांव