ठळक मुद्देझाडास विपुलने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले.
लोकमत न्यूज नेटवर्कसुरगाणा : बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील बुबळी येथे घडली. विपुल बाबूराव पवार (१८) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे.विपुल हा अकरावी उत्तीर्ण होऊन बारावीत गेला होता. सोमवारी सकाळी ६ वाजेदरम्यान विपुलचे वडील राहत्या घराचा मागील दरवाजा उघडून बाहेर आले असता समोरील शेवग्याच्या झाडास विपुलने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. त्यांना मोठा धक्का बसला. विपुल हा वरील मजल्यावरील गॅलरीत अभ्यास करून तिथेच झोपत असे. पोलीसपाटील सखाराम चौधरी यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. विपुलचे आई-वडील शिक्षक असून त्याची बहीण नाशिक येथे इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहे. विपूलच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही.