घोटी : इगतपुरी तालुक्यातील शेणीत येथे ५ ते ६ महिन्यांच्या मृत बिबट्याचे अवयव काढून घेतल्याची घटना शनिवारी उघडकीस आली.इगतपुरी वनपरिक्षेत्रच्या अधिकाºयांनी याबाबत अधिक तपास करून गुन्हेगारास काही तासांतच अटक करून न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची वनकोठडी मिळाल्याची माहिती वनपरीक्षेत्र अधिकारी आर.पी. ढोमसे यांनी दिली. शेणीत येथे ऊसतोडीचे काम सुरु असून, येथीलच शेतकरी संदीप मोरे यांच्या मालकीच्या गट क्र मांक ४०४ मध्ये ५ ते ६ महिन्यांचा मादी जातीचा बिबट्या मृतावस्थेत असल्याची माहिती इगतपुरी वनविभागाला मिळाली. इगतपुरीचे वनपरीक्षेत्र अधिकारी आर. पी. ढोमसे, वनपरीमंडळ अधिकारी जी. आर. जाधव, वनरक्षक एफ. जे. सय्यद, एस.के. बोडके, बी.व्ही. दिघे, श्रीमती आर.टी. पाठक व इतर कर्मचाºयांंनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. यावेळी बिबट्याच्या पायाचा पंजा नसल्याचे निदर्शनास आले. वनाधिकाºयांनी अधिक तपास करून संशयित कारभारी बाबूराव पवार (रा. कोल्ही, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद) यास अटक करून त्याच्याकडून मुद्देमाल हस्तगत केला. संशयित पवार यास शनिवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची वनकोठडी सुनावली आहे. सहायक वनसंरक्षक रोहयो वन्यजीव संरक्षण यांच्या मार्गदर्शनाखाली इगतपुरीचे वनपरीक्षेत्र अधिकारी आर. पी. ढोमसे हे पुढील तपास करीत आहे.
मृत बिबट्याचे अवयव काढणाºयास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 00:07 IST
घोटी : इगतपुरी तालुक्यातील शेणीत येथे ५ ते ६ महिन्यांच्या मृत बिबट्याचे अवयव काढून घेतल्याची घटना शनिवारी उघडकीस आली.
मृत बिबट्याचे अवयव काढणाºयास अटक
ठळक मुद्दे गुन्हेगारास काही तासांतच अटक करून न्यायालयात हजर केले चार दिवसांची वनकोठडी सुनावली