शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
4
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
5
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
6
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
7
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
8
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
9
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
10
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
11
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
12
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
13
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
14
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
15
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
16
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत मुसक्या आवळल्या
17
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
18
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
19
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार

‘मोजणी’त अडकल्या वनजमिनी

By admin | Updated: December 4, 2015 22:49 IST

भवितव्य अंधारात : आदिवासींचा हक्क कागदावरच

नाशिक : गेल्या काही वर्षांपासून आवश्यक ते कागदोपत्री पुरावे, घटनास्थळाचा पंचनामा, वन कायद्यान्वये झालेली शिक्षा असे सारे सोपस्कार पार पाडल्यानंतर परिपूर्ण झालेल्या आदिवासींच्या अतिक्रमित वनजमिनींचे दावे पुन्हा एकदा चौकशीच्या फेऱ्यात सापडले असून, आदिवासींनी दहा वर्षांपूर्वी केलेले वनजमिनींवरील अतिक्रमण मोजण्याचा अजब निर्णय घेऊन जिल्हा प्रशासनाने पुन्हा वेळकाढूपणा अवलंबिल्याने आदिवासींचा हक्क कागदावरच राहिला आहे. जिल्ह्णातील आदिवासींना त्यांनी अतिक्रमित केलेल्या वनजमिनींचा ताबा देण्याची प्रक्रिया अनेक वर्षांपासून सुरू होऊनही अद्याप पूर्ण झालेली नाही. आदिवासींनी दाखल केलेले दावे कागदोपत्रांच्या पूर्ततेअभावी फेरचौकशीला तालुका समिती व तेथून पुन्हा प्रांत अधिकाऱ्यांकडे वेळोवेळी पाठवून परिपूर्ण दावे जिल्हास्तरीय समितीच्या पटलावर ठेवण्यासाठी सज्ज झाल्यानंतर जिल्हास्तरीय समितीकडे अध्यक्षांसह सदस्यांनीही पाठ फिरविल्यामुळे वन हक्क कायद्याचे काम तसूभरही पुढे सरकत नसल्याच्या तक्रारी आहेत. विशेष करून आदिवासी व वन खात्याची या संदर्भातील उदासीनता लक्षात घेता, आजवर एकाही आदिवासीला वनजमिनीचा प्रत्यक्ष ताबा मिळू शकलेला नाही. गेल्या महिन्यात वन हक्क कक्षाने परिपूर्ण केलेले दावे जिल्हास्तरीय समितीसमोर मान्यतेसाठी ठेवले असता, वन खात्याने त्यावर हरकत घेत, आदिवासींनी २००५ पूर्वी वनजमिनींवर अतिक्रमण केले, त्या जागेच्या क्षेत्राचे पुरावे काय असा सवाल केला व २००५ पूर्वी असलेले अतिक्रमण व २००९ पर्यंतचे अतिक्रमण याची प्रत्यक्ष मोजणी करण्याची सूचना केली. त्यामुळे १६०० वन हक्काच्या दाव्यांना या बैठकीत मंजुरी मिळू शकली नाही. त्यामुळे कोणत्याही निर्णयाविना नोव्हेंबर महिन्याची बैठक पार पडली असली तरी, आदिवासींनी केलेले मूळ अतिक्रमण शोधून काढण्याचा निर्णय जिल्हास्तरीय समितीने घेऊन तोपर्यंत दाव्यांना मंजुरी न देण्याचे ठरविले आहे; मात्र ही मोजणी कोणी व कोणत्या यंत्रणेमार्फत करावी याचा स्पष्ट उलगडा होऊ शकलेला नाही. (प्रतिनिधी)