शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
4
भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
5
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
6
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
7
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
8
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
9
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
10
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
11
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
12
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
13
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
14
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
15
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
16
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
17
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
18
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
19
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
20
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता

एसटीचा संप मिटला : बारा वाजेपासून नाशिकची ‘लाईफलाईन’ होणार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 22:41 IST

रात्री बारा वाजता नाशिकची ‘लाईफलाईन’ मानली जाणारी लालपरी पुन्हा रस्त्यावर धावणार आहे.

ठळक मुद्दे बारा वाजेपासून शहर बससेवा पुर्ववत होणार एस.टीची चाके फिरण्याचा मार्ग रात्री दहा वाजेनंतर मोेकळा

नाशिक : दोन दिवसांपासून थबकलेली एस.टीची चाके फिरण्याचा मार्ग रात्री दहा वाजेनंतर मोेकळा झाला. बसचालक-वाहकांनी संप मागे घेतल्याची घोषणा परिवहन मंत्र्यांच्या बैठकीनंतर करण्यात आली. बारा वाजेपासून शहर बससेवा पुर्ववत होणार असल्याची माहिती परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाच्या व्यवस्थापनाने दिली आहे. जुने मध्यवर्ती व नवीन मध्यवर्ती बसस्थानक, महामार्ग बसस्थानक, निमाणी बसस्थानकांमध्ये प्रवाशांची वर्दळ जरी दिसून आली तरी बसेस मात्र दिसेनाशा झाल्या होत्या. अर्धा पाऊण तासांच्या अंतरानंतर एखादी शहर बसस्थानकामध्ये येत होती. खासगी वाहतुकदारांना प्रवासी वाहतुकीचा ‘ग्रीन सिग्नल’ मिळाल्याने थेट बसस्थानकाच्या आवारात खासकी वाहतुकदारांनी जीप, रिक्षांसह अन्य प्रवासी वाहने उभी करुन वाहतूक सुरू केल्याचे चित्र शनिवारी दिवसभर पहावयास मिळाले. बसस्थानकांच्या आवारात शुकशुकाट पहावयास मिळत होता. रिक्षाथांबे, खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेस, जीप, टॅक्सीच्या थांब्यांवर प्रवाशांची गर्दी दिसून आली. एकूणच दिवसभर लाल परी रस्त्यावरुन जणू अदृश्य झाली होती; मात्र रात्री बारा वाजता नाशिकची ‘लाईफलाईन’ मानली जाणारी लालपरी पुन्हा रस्त्यावर धावणार आहे.

टॅग्स :ST Strikeएसटी संपNashikनाशिक