शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
3
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
4
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
5
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
6
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
7
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
8
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
9
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
10
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
11
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
12
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
13
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
14
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
15
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
16
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
17
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
18
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
19
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
20
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा

कडेकोट बंदोबस्त यशस्वी; शहरात निवडणूक काळात शांतता कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 17:22 IST

पोलीस आयुक्तालय हद्दीत आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी संपुर्ण सुरक्षाव्यवस्थेचा वेळोवेळी आढावा घेत अधिकारी-कर्मचाऱ्यांवर जबाबदारी सोपवून विश्वास दाखवत सुक्ष्मपणे बंदोबस्ताचे नियोजन केल्याने शांततापूर्ण वातावरणात निवडणूकसह विविध जयंती उत्सवांच्या मिरवणूका पार पडल्या.

ठळक मुद्देकुठल्याही स्वरूपाची गंभीर घटना घडली नाही. ३३वेळा कोम्बींग; रात्री पोलिसांनी गुन्हेगारांना दिला हिसका

नाशिक : पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात एकूण १ हजार २१७ बूथवर मतदानप्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडली. किरकोळ तक्रारींचा अपवाद वगळात कोठेही कुठल्याही स्वरूपाची गंभीर घटना घडली नाही. यामुळे मतदानाच्या दिवशी तसेच संपुर्ण निवडणूक काळात आदर्श आचारसंहितेत कायदासुव्यवस्था अबाधित राहिली. आयुक्तालय स्तरावर विशेष पोलीस दलाच्या सशस्त्र जवानांसह सुमारे साडेतीन हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. एकूणच शहरात सर्वत्र पार पडलेली मतदान प्रक्रिया हे ‘खाकी’चे यश असल्याचे नागरिकांनी सांगितले.लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू होताच पोलीस आयुक्तालय हद्दीत आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी संपुर्ण सुरक्षाव्यवस्थेचा वेळोवेळी आढावा घेत अधिकारी-कर्मचाऱ्यांवर जबाबदारी सोपवून विश्वास दाखवत सुक्ष्मपणे बंदोबस्ताचे नियोजन केल्याने शांततापूर्ण वातावरणात निवडणूकसह विविध जयंती उत्सवांच्या मिरवणूका पार पडल्या.नांगरे-पाटील यांनी आदर्श आचारसंहिता जाहीर होताच ‘ब्लू-प्रिंट’वरील गुन्हेगारांवर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार परिमंडळ-१ व २मध्ये उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, अमोल तांबे तसेच गुन्हे शाखेच्या उपआयुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी यांनी आदेशानुसार धडक कारवाईला प्रारंभ केला. सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यापासून तडीपार गुंडांचा शोध घेऊन शहरात आढळून आल्यास कारवाई करण्यापर्यंत तसेच टवाळखोरांनाही ‘खाकी’ने दंडुका दाखविला. यामुळे पोलिसांचा धाक शहरात निर्माण झाला होता. महिनाभरात आयुक्तालय हद्दीत ५वेळा आॅल आउट आॅपरेशन राबवून भर रात्री पोलिसांनी गुन्हेगारांना हिसका दिला. तसेच ३३वेळा कोम्बींग आॅपरेशन मोहीमदेखील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सातत्याने राबविली गेली. यामुळे गुन्हेगारांना जरब बसण्यास मदत झाली.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकVotingमतदान