शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

सत्तासंघर्षात २८९ व्या आमदाराची ‘अशीही’ सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 01:13 IST

गेल्या सव्वा महिन्यापासून राज्यात रंगलेल्या सत्तानाट्यावर अखेर गुरुवारी (दि.२८) शिवतीर्थावर झालेल्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्यानंतर पडदा पडला आणि विधानसभेवर निवडून गेलेल्या २८८ आमदारांसह जनतेनेही दीर्घ सुस्कारा सोडला. राजकीय अनिश्चिततेच्या याच कालावधीत सिन्नर तालुक्याच्या पंचक्रोशीत लोकांच्या मनातील २८९ वे आमदार म्हणून परिचित असलेल्या जायगाव येथील महादू सखाराम गिते या ज्येष्ठाचीही महिनाभर सुरू असलेल्या टोमण्यांपासून सुटका झाली आणि त्यांचा हा आनंद ग्रामस्थांनी एकत्र येऊन साजरा केला.

ठळक मुद्देजायगावची इरसाल कथा : ग्रामस्थांनी एकत्र येत केला सत्कार

दत्ता दिघोळे ।लोकमत न्यूज नेटवर्कनायगाव : गेल्या सव्वा महिन्यापासून राज्यात रंगलेल्या सत्तानाट्यावर अखेर गुरुवारी (दि.२८) शिवतीर्थावर झालेल्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्यानंतर पडदा पडला आणि विधानसभेवर निवडून गेलेल्या २८८ आमदारांसह जनतेनेही दीर्घ सुस्कारा सोडला. राजकीय अनिश्चिततेच्या याच कालावधीत सिन्नर तालुक्याच्या पंचक्रोशीत लोकांच्या मनातील २८९ वे आमदार म्हणून परिचित असलेल्या जायगाव येथील महादू सखाराम गिते या ज्येष्ठाचीही महिनाभर सुरू असलेल्या टोमण्यांपासून सुटका झाली आणि त्यांचा हा आनंद ग्रामस्थांनी एकत्र येऊन साजरा केला.गावकीचे राजकारण हे जसे सुडाचे तसेच ते मनोरंजनानेही भरलेले असते. गावातील पारावर रंगणाऱ्या गप्पांच्या फडात राजकारण हा प्रमुख विषय असतो. गावामधील काही लोक हे चेष्टेचाही विषय बनत असतात. गावातील इरसालपणाच्या गोष्टी रंजक असतात. असाच रंजकतेचा नमुना जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात पहायला मिळाला. तालुक्यातील जायगाव येथील महादू गिते या ज्येष्ठ नागरिकाचे शिक्षण जेमतेम असले तरी राजकारणाच्या इतिहास-भूगोलात त्यांचे ज्ञान एखाद्या राजकीय तज्ज्ञ विश्लेषकापुढेही फिके पडावे असे आहे. म्हणून महादू गिते हे पंचक्रोशीत ‘आमदार’ या टोपण नावानेच परिचित आहेत. राज्याच्या राजकारणात गेल्या सव्वा महिन्यापासून सत्तेसाठी नाट्य सुरू होते. रोजच्या घटना-घडामोडी, सरकार स्थापनेला होणारा विलंब, संजय राऊत यांची रोजची पत्रकार परिषद, आमदारांची पळवापळवी यापासून ते कोण होणार मुख्यमंत्री, यापर्यंतच्या चर्चांना उधाण आले असताना त्यासंबंधीची विचारणा ग्रामस्थांकडून महादू गिते यांनाच केली जायची. महादू गिते दिवसभर जेथे जातील तेथे त्यांना काय आमदार, आज कुणाला पाठिंबा देणार, तुम्हाला कुणी पळवून नेले नाही का, असा प्रश्नांचा भडिमार करत ग्रामस्थ त्यांना भंडावून सोडत असत. महादू गितेही सुरुवातीला या टोमण्यांमुळे गमतीने घेत त्यांची उत्तरे द्यायचे. परंतु जसाजसा सत्तास्थापनेला विलंब होत गेला तशी त्यांची उत्तरे देताना तारांबळ उडायला लागली. अखेर गुरुवारी (दि.२८) मुंबईत शिवतीर्थावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तेव्हा साºया महाराष्टÑाने जसा सुटकेचा नि:श्वास सोडला त्याहून अधिक दीर्घ सुस्कारा जायगावमधील गावकऱ्यांचे आमदार महादू गिते यांनी टाकला. महिनाभराच्या सत्तासंघर्षात टोमण्यांपासून सुटका झाल्याने महादू गिते यांना आनंद झाला आणि सत्तानाट्यावर पडदा पडल्याने ग्रामस्थांनीही त्यांच्या आनंदात सहभागी होत ग्रामपंचायत कार्यालयासमोर एकत्र जमत राज्यातल्या या अघोषित २८९ व्या आमदाराचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

टॅग्स :Politicsराजकारण