नाशिक : भावना दुखावणारे संवाद आणि चित्रीकरण असल्याचा आरोप करीत शहरातील ‘दशक्रिया’ चित्रपटाच्या प्रयोगाला सकल ब्राह्मण समाजाकडून कडाडून विरोध करण्यात आला. तथापि, विरोध मोडून पोलीस बंदोबस्तात ‘दशक्रिया’ चित्रपटाचा खेळ पार पडला.या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच ब्राह्मण समाजाने हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले होत. परंतु त्यानंतरही शुक्रवारी सिनेमॅक्समध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला. दुपारी शुक्रवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास विविध ब्राह्मण समाज संघटनांनी निदर्शने केली आणि चित्रपट प्रदर्शनाला बंदी घालण्याची मागणी केली. ‘दशक्रिया’ चित्रपटातील आक्षेपार्ह संवाद वगळण्याची मागणी करत यावेळी विरोध दर्शविण्यात आला. यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. जातीय तेढ निर्माण करणारा चित्रपट प्रदर्शित न करण्याची मागणी करण्यात आली. मात्र, याबाबत शासन स्तरावरून कुठलीही सूचना प्राप्त न झाल्याने चित्रपट पूर्व नियोजनाप्रमाणेच प्रदर्शित होणार असल्याची माहिती चित्रपटगृहातर्फे दिली. सिटी सेंटर मॉल सिनेमॅक्स चित्रपटगृहात दुपारी २.३० वाजता या चित्रपटाचा एकमेव शो ठेवण्यात आला आहे. या आंदोलनात पुरोहित संघांचे अध्यक्ष सतीश शुक्ल, बहुभाषिक ब्राह्मण महासंघांचे अध्यक्ष अॅड. भानुुदास शौचे, तसेच चंद्रशेखर पुरोहित, हेमंत तलाजिया, तुषार जोशी, माधवराव भणगे, श्रीकृष्ण बुवा सिन्नरकर महाराज, वैभव दीक्षित, अवधुत कुलकर्णी, उदय जोशी, अमित पंचभयै, ओमकार शौचे, प्रतीक शुक्ल यांच्यासह अन्य संस्थादेखील आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.
‘दशक्रिया’ चित्रपटाला सकल ब्राह्मण समाजाकडून तीव्र विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 00:19 IST
भावना दुखावणारे संवाद आणि चित्रीकरण असल्याचा आरोप करीत शहरातील ‘दशक्रिया’ चित्रपटाच्या प्रयोगाला सकल ब्राह्मण समाजाकडून कडाडून विरोध करण्यात आला. तथापि, विरोध मोडून पोलीस बंदोबस्तात ‘दशक्रिया’ चित्रपटाचा खेळ पार पडला. या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच ब्राह्मण समाजाने हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले होत.
‘दशक्रिया’ चित्रपटाला सकल ब्राह्मण समाजाकडून तीव्र विरोध
ठळक मुद्दे पोलीस बंदोबस्तात ‘दशक्रिया’ चित्रपटाचा खेळ विविध ब्राह्मण समाज संघटनांनी निदर्शने केली जोरदार घोषणाबाजी