मेशी - गेल्या अनेक दिवसांपासून दडी मारून बसलेल्या वरूणराजाने सलग दोन दिवस दमदार हजेरी लावून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. यामुळे आता खरिपाच्या पेरणीची कामे सुरू. होतील. कालपासून मेशीसह , डोंगरगाव , निंबोळा , महालपाटणे आदी गावांना पावसाने सुरु वात झाल्याने खते , बियाण्यांच्या दुकानांमध्ये खरेदीसाठी गर्दी शेतकºयांची वाढली आहे. मृग नक्षत्र कोरडे जाते की काय असे वाटत असताना झालेल्या पावसाने मोठा दिलासा मिळाला आहे. अजून दोन तीन सलग पाऊस झाल्यास सर्व अडचणी दुर होण्यास मदत होईल असे जाणकारांचे म्हणणे आहे. उशिरा का होईना परंतु पाऊस सुरू झाल्याने शेतक-यांचा जीव भांड्यात पडला आहे. शेती औजारे दुरु स्तीची कामे सुरू आहेत. जायखेडा परिसरात पावसाने वादळी वाºयासह जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे अनेक शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले; मात्र दीर्घ प्रतीक्षेनंतर पाऊस आल्याने शेतकरीवर्ग सुखावला असून, खरिपाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. जायखेडा येथील शेतकरी कैलास चौधरी यांच्या कांदा चाळीवर झाकलेला प्लॅस्टिक कागद उडाल्याने कांदे भिजून मोठे नुकसान झाले, तर चिंतामण ब्राह्मणकार या शेतकºयाच्या शेतातील शेडनेट उडून गेल्याने हजारो रुपयांचे नुकसान झाले. याचप्रमाणे अनेक शेतकºयांना कमी-अधिक प्रमाणात नुकसानीचा सामना करावा लागला.
मेशीसह,डोंगरगाव परिसरात पावसाचे दमदार आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 2:16 PM