शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

चौघा अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 00:58 IST

लोकसभा निवडणुकीसाठी दिव्यांग मतदारांना देण्यात येणाऱ्या सोयीसुविधांसाठी जिल्हास्तरावर स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीच्या पहिल्याच बैठकीकडे पाठ फिरविणाºया शहरातील चौघा वरिष्ठ अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावूनही त्याचा मुदतीत खुलासा न करणाºया अधिकाºयांवर जिल्हा प्रशासनाने नाराजी व्यक्त केली असून, अशा अधिकाºयांना धडा शिकविण्यासाठी त्यांची खातेनिहाय चौकशी करण्याचा प्रस्ताव तयार करण्याची तयारी केली जात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

नाशिक : लोकसभा निवडणुकीसाठी दिव्यांग मतदारांना देण्यात येणाऱ्या सोयीसुविधांसाठी जिल्हास्तरावर स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीच्या पहिल्याच बैठकीकडे पाठ फिरविणाºया शहरातील चौघा वरिष्ठ अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावूनही त्याचा मुदतीत खुलासा न करणाºया अधिकाºयांवर जिल्हा प्रशासनाने नाराजी व्यक्त केली असून, अशा अधिकाºयांना धडा शिकविण्यासाठी त्यांची खातेनिहाय चौकशी करण्याचा प्रस्ताव तयार करण्याची तयारी केली जात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.निवडणूक आयोगाने प्रत्येक जिल्हा पातळीवर दिव्यांग मतदारांना मतदानाच्या दिवशी सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी १७ सप्टेंबर २०१८ रोजी जिल्हास्तरीय समिती स्थापन केली. या समितीत स्थानिक स्वराज्य संस्थांचे तसेच शासनाच्या सेवेतील समाजकल्याण अधिकारी, शिक्षणाधिकाºयांचा समावेश करण्यात आला. या समितीची पहिली बैठक १५ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. या बैठकीकडे जिल्हा परिषद व महापालिकेचे समाजकल्याण अधिकारी तसेच महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रोहिदास बहिरम, जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी बच्छाव अशा चौघांनी त्याकडे पाठ फिरविली. जिल्हाधिकाºयांनी सदरची बाब गांभीर्याने घेत गैरहजर असलेल्या चौघा अधिकाºयांना नोटिसा बजावून खुलासा करण्यासाठी तीन दिवसांची मुदत दिली होती. तथापि, ही मुदत टळून गेल्यावरही संबंधितांकडून नोटिसीची दखल न घेतली गेल्याने त्यांना पुन्हा स्मरणपत्र पाठविण्यात आले व कारवाई करण्याची तंबी देण्यात आली. मात्र तरीही खुलासा करण्यासाठी दहा दिवसांचा कालावधी उलटून गेल्यावर मंगळवारी या चौघा अधिकाºयांनी आपले म्हणणे सादर केले.खात्यांतर्गंत चौकशीचे प्रस्तावनोटीस देऊनही त्याची दखल घेण्यास या अधिकाºयांनी टाळाटाळकेल्याची बाब जिल्हा प्रशासनाला खटकली आहे. अधिकाºयांकडून बैठकांना गैरहजर राहणे व नोटीस बजावल्यावर त्याची दखल न घेणे या दोन्ही बाबी गंभीर मानून या चौघा अधिकाºयांची खात्यांतर्गत चौकशी करण्याचे प्रस्ताव सादर करण्याची तयारी सुरू करण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Electionनिवडणूकnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय