शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वाळू माफीयांची तलाठ्यास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 16:12 IST

देवळा : तालुक्यात गिरणा नदीपात्रात वाळू माफीयांनी केलेल्या बेदम मारहाणीत तलाठ्याची प्रकृती अत्यवस्थ असून त्यांना उपचारासाठी नासिक येथे जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

देवळा : तालुक्यात गिरणा नदीपात्रात वाळू माफीयांनी केलेल्या बेदम मारहाणीत तलाठ्याची प्रकृती अत्यवस्थ असून त्यांना उपचारासाठी नासिक येथे जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान घटनेच्या निषेधार्थ देवळा तालुक्यातील तलाठी व कोतवालांनी काम बंद आंदोलन सुरू केले. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार तहसिलदार देवळा यांच्या आदेशानुसार महसूल विभागाच्या गस्ती पथकाने गुरु वारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास लोहोणेर हद्दीत गिरणा नदीपात्रातून अवैधरीत्या वाळूची वाहतुक करणारे दोन ट्रॅक्टर पकडले. तलाठी अंबादास रामदास पुरकर यांनी आपल्या मोबाईलने हया ट्रॅक्टरचे व्हिडीओ चित्रिकरण करण्याचा प्रयत्न केला असता १५ ते २० अज्ञात व्यक्तिंनी त्यांचा मोबाईल हिसकावून घेत त्यांना लाथाबुक्यांनी व फ़ावड्याचे दंडांनी बेदम मारहाण केली. त्यात पुरकर यांना छातीला व डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे ते बेशुध्द पडले.पथकातील त्यांचे सहकारी तलाठी कुलदीप नरवडे व गजानन भालके यांनी पुरकर यांना वाचवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही धक्काबुक्की करण्यात आल्यामुळे त्यांनी आपला जीव वाचवत तेथून पळ काढला. दरम्यान ट्रॅक्टर व त्यासमवेत असलेल्या संशयित अज्ञात व्यक्ति पसार झाले. गस्ती पथकाच्या वाहनावरील ड्रायव्हरच्या मोबाईलवरून घटनेची माहीती कळविण्यात आली. पुरकर यांना देवळा ग्रामीण रु ग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृति अत्यवस्थ झाल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून तातडीने नासिक येथे जिल्हा रु ग्णालयात हलविण्यात आले. सदर घटनेचा देवळा तालुका तलाठी व कोतवाल संघटनेने निषेध केला असून आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक