शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

पंचवटीत डिस्टन्सिंगच्या नियमांना हरताळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 00:00 IST

पंचवटी : नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन जीवनावश्यक वस्तूंसह बहुतांश सर्वच दुकाने सुरू करण्यास प्रशासनाने परवानगी दिल्याने बाजारपेठ खुली झाली असून, पंचवटीत दोन दिवसांपासून फिजिकल डिस्टन्सिंगचा पूर्णपणे फज्जा उडाल्याचे आढळून आले आहे.

पंचवटी : नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन जीवनावश्यक वस्तूंसह बहुतांश सर्वच दुकाने सुरू करण्यास प्रशासनाने परवानगी दिल्याने बाजारपेठ खुली झाली असून, पंचवटीत दोन दिवसांपासून फिजिकल डिस्टन्सिंगचा पूर्णपणे फज्जा उडाल्याचे आढळून आले आहे. पंचवटी परिसरात पेट्रोलपंप असो की कपड्याची दुकाने, दूध केंद्र, भाजीपाला दुकाने याठिकाणी कोणत्याही प्रकारच्या नियमांचेपालन केले जात नसल्याचे दिसून येत आहे.कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन स्तरावर विशेष प्रयत्न केले जात असताना नागरिकांनी मात्र शासनाच्या नियमाला केराची टोपली दाखवली आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी पोलिसांकडून रस्त्याने विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई केली जात होती, मात्र आता पोलिसांनी कारवाई मागे घेतल्याने सकाळी, सायंकाळी फिरणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.पंचवटी परिसरात बुधवारच्या दिवशी अनेक व्यावसायिकांनी सकाळी आपापली दुकाने उघडली त्यावेळी विविध वस्तू खरेदीसाठी शेकडो नागरिकांनी रस्त्यावर धाव घेतल्याने काही वेळ लोकांमध्ये सूट दिल्याचे चित्र बघायला मिळाले. परिसरात असलेले कपड्याचे दुकान, मिठाई दुकान, हॉटेल, चप्पल दुकान, सलून या ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. विशेष म्हणजे विविध दुकानांमध्ये संबंधित दुकानदार व खरेदीसाठी आलेल्या नागरिकांकडूनदेखील कोणत्याही प्रकारे फिजिकल डिस्टन्सचे पालन केले जात नव्हते.------४शासनाने सर्व दुकाने सुरू करण्यासाठी परवानगी दिली त्याचा फायदा घेत अनेक व्यावसायिकांनी नेहमीप्रमाणे दुकाने सुरू केल्याने गर्दी वाढली आहे. त्यामुळे धोकादेखील अधिक वाढला आहे. बुधवारी दिवसभर शहरातील मेनरोड, रविवार कारंजा, जुने नाशिक भागासह अनेक ठिकाणी नागरीकांची गर्दी दिसुन आली. दुचाकीवर एकच व्यक्ती असावा अशा सूचना असल्या तरी अनेक ठिकाणी या नियमाला हरताळ फासला जात असल्याचे चित्र पहावयास मिळाले.

टॅग्स :Nashikनाशिक