शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुक्त कळवणमध्ये पुन्हा एकाला बाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 00:27 IST

कळवण : कोरोनामुक्त झालेल्या कळवण तालुक्यात पुन्हा एकदा करोनाचा शिरकाव झाला असून मानुर गावातील शासकीय कार्यालयातील ५४ वर्षीय कर्मचाऱ्याचा ...

ठळक मुद्देमानूरचा कर्मचारी बाधित : २१ जण होम क्वॉरण्टाइन; शहरवासीय चिंतित

कळवण : कोरोनामुक्त झालेल्या कळवण तालुक्यात पुन्हा एकदा करोनाचा शिरकाव झाला असून मानुर गावातील शासकीय कार्यालयातील ५४ वर्षीय कर्मचाऱ्याचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आल्याने कळवणकरांच्या पुन्हा एकदा चिंता वाढल्या आहेत.मानूर येथील कोरोना बाधित रु ग्णाच्या संपर्कातील २१ जणांना होम क्वारण्टाइन करण्यात आले असून त्यापैकी दोन जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे यात एका खाजगी डॉक्टराचाही समावेश असल्याचे समजते. दरम्यान, प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून मानूर ग्रामपंचायतीने गावात जंतुनाशक फवारणी केली आहे. एकीकडे जिल्ह्यात करोना चा संसर्ग वाढत असताना कळवण तालुक्यात मात्र सद्यस्थितीत एकही रु ग्ण नव्हता. मागील महिन्यात एका अकरा वर्षीय मुलाच्या रूपाने पहिला पॉझिटीव्ह रुग्ण आढळला होता. मात्र त्यात कुठलीही लक्षणे नसल्याने आणि त्याच्या संपर्कातील सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने कळवणकरांनी सुटकेचा नि:श्वास टाकला होता. मात्र आता पुन्हा एकही रु ग्ण संख्या नसलेल्या कळवण तालुक्यात रु ग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. संबंधित रु ग्ण हा ५४ वर्षीय पुरु ष असून ते मानूर येथेच वास्तव्यास आहेत.मात्र मूळचे जळगाव जिल्ह्यातील यावल येथील रहिवासी आहेत. सोमवारी (दि.१५) त्यांना अत्यवस्थ वाटू लागल्याने कळवण येथील उपजिल्हा रुग्णालयात तपासणी केल्यानंतर त्याचे स्वॉब घेऊन त्यांना मालेगाव येथे क्वारण्टाइन करण्यात आले होते. त्यांचा अहवाल प्राप्त होऊन तो पॉझिटीव्ह आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सुधीर पाटील यांनी दिली.संबंधित रु ग्ण राहत असलेला परिसर कंटेन्मेंट झोन घोषित करण्यात आला असून मानुर गावात बफर झोन जाहीर करण्यात आला आहे प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली असून आरोग्य विभागाकडून परिसराचा सर्व्हे करण्यात आला रु ग्णाच्या नजीकच्या संपर्कातील व्यक्तींचे स्वॅब तपासणी साठी पाठवले जाणार आहेत. कोरोनाचा शिरकाव झाल्याने मानुरसह कळवणकरांची चिंता वाढली आहे.कळवण तालुक्यातील मानूर येथे वास्तव्यास असलेल्या एका शासकीय कार्यालयातील ५४ वर्षीय कर्मचाºयाचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्याने त्याच्या नजीकच्या संपर्कातील हाय रिस्क मधील दोन व्यक्ती तर लो रिस्क मधील १९ व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. संबंधित कर्मचारी काम करत असलेले शासकीय कार्यालय मानूर येथेच असून हे कार्यालय सील करण्यात आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य