लोकमत न्यूज नेटवर्कइगतपुरी : तालुक्यातील भावली धरण परीसरात पावसाचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या १८ मद्यधुंद तरु णांवर इगतपुरी पोलिसांनी कारवाई केली. या सर्वांची वैद्यकीय तपासणी ग्रामीण रु ग्णालयात करण्यात आली आहे.इगतपुरी तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्याने आल्हाददायक वातावरण निर्माण झाले आहे. या वातावरणाचा व निसर्गाचा आनंद घेण्यासाठी रविवारी मोठया प्रमाणावर मुंबई व नाशिक येथील पर्यटकांची वर्दळ होती. दरम्यान,भावली धरणाच्या परिसरात सार्वजनिक ठिकाणी सायंकाळी ४.३० ते ५ वाजेच्या सुमारास नाशिक येथील १८ तरु णांनी मद्यसेवन करून गोंधळ घालत,जोरजोराने आरडा ओरड करत शांततेचा भंग करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. इगतपुरी पोलिसांनी तात्काळ या मद्यधुंद तरु णांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर या सर्व तरु णांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निलेश सोनवणे , के. के. जाधव,गणेश वराडे ,सचिन देसले करत आहे.
‘भावली’जवळ धांगडधिंगा; १८ जणांवर कारवाई
By admin | Updated: July 4, 2017 00:31 IST